ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला –

मुंबई,नाशिक,दि. ९ सप्टेंबर :- सिन्नर भुषण ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, सिन्नर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी असलेले ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहर व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. राज्यभरात त्यांचा भक्त परिवार होता. त्यांनी राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविली. धार्मिक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सिन्नर भुषण पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने राज्यभरातील वारकरी संप्रदायाची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचा हरपला आहे. मी व माझे कुटुंबीय ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

श्रद्धांजली !

सिन्नर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांचे दु:खद निधन झाले. अत्यंत दु:ख झाले. ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांनी वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्र फडकविली. सिन्नर तसेच नाशिक जिल्हाभरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यरत राहून मार्गदर्शन केले. त्यांच्या अलौकिक कार्यामुळे त्यांना सिन्नर भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ते केवळ सिन्नर नव्हे तर नाशिक जिल्ह्याचे भुषण होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे. मी व माझे कुटुंबीय ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

भावपूर्ण श्रद्धांजली !

समीर भुजबळ,
माजी खासदार, नाशिक लोकसभा मतदारसंघ.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.