ylliX - Online Advertising Network

शासकीय योजनांची माहिती मिळण्यासाठी ‘सुराज्य रथ’ स्तुत्य उपक्रम- दिलीप स्वामी

नाशिक : नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सुरू करण्यात आलेला ‘सुराज्य रथ’ हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

अपर जिल्हाधिकारी कार्यालय, मालेगांव येथे ‘सुराज्य रथ’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, तहसीलदार जे.पी. निकम, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, नायब तहसीलदार अमित पवार आदी उपस्थित होते.

श्री.स्वामी म्हणाले, रथाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविल्याने नागरिकांमध्ये जागृती निर्माण होईल. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. विकासात जनतेची भूमिकाही महत्वाची असून सुराज्याकडे वाटचाल करताना त्यांच्यातील जागृती महत्वाची आहे.

लोकमान्य टिळकांनी केलेल्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ या घोषणेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या रथाचा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे श्री.लळीत यांनी सांगितले. नागरिकांनी शासनाच्या योजना जाणून घेण्यासाठी रथाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर शहरातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांनी भेट देऊन योजनांची माहिती जाणून घेतली. शुक्रवारी सुराज्य रथ नांदगाव येथे असणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.