शहर विकास नियंत्रण नियमावलीबाबत मुख्यमंत्र्यांकडून नाशिककरांचा विश्वासघात – आमदार जाधव

शहर विकास नियंत्रण नियमावलीबाबत मुख्यमंत्र्यांकडून नाशिककरांचा विश्वासघात
– आमदार जयवंतराव जाधव
नाशिक,दि.२५फेब्रुवारी:- शहर विकास नियंत्रण नियमावलीबाबत मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसून नाशिककरांचा विश्वासघात केला आहे. नियमावलीमध्ये अनेक जाचक अटी टाकल्यामुळे नाशिकच्या विकासाला खिळ बसणार असल्याने मुख्यमंत्र्याचे नाशिकला ‘दत्तक’  घेण्याचे विधान केवळ निवडणुकीपुरते होते काय ? अशी सडकावून टीका आमदार जयवंतराव जाधव यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी नाशिक शहराची शहर नियंत्रण विकास नियमावली सोशल मिडीयावर पसरली होती. त्यावेळी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली होती. परंतु निवडणुका लक्षात घेता सदर नियमावली ही खोटी असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ही बाब फेटाळून लावली होती. मात्र परवा नाशिक महापालिकेचे निकाल जाहीर होताच सोशल मिडीयावर फिरणारी ‘ती’ नियामवली जशीच्या तशी नाशिक महापलिकेच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्याचे पितळ उघडे पडले असल्याचे आमदार जाधव यांनी म्हटले आहे. भाजप सरकारने महापालिका निवडणुकीच्या काळात वेळ मारून नेली मात्र निवडणूक होता क्षणी नाशिककरांची घोर फसवणूक केली आहे . यावरून सरकारची नियत खोटी असल्याचे सिद्ध होते.
  नाशिक महापालिकेची सत्ता माझ्या हातात द्या, तुमचे नाशिक मी पाच वर्षांसाठी दत्तक घेतो’, अशी भावनिक साद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घातली. नाशिककरांनीही त्याला तेवढाच प्रतिसाद देत भाजपला निर्विवाद बहुमत दिले. त्यामुळे शहराचा सर्वात मोठा प्रश्न असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीतून नाशिककरांना दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, निवडणुकीच्या निकालाच्या सायंकाळी शासनाच्या वतीने सोशल मीडियावर व्हायरल झालेली नाशिकची विकास नियंत्रण नियमावली प्रत्यक्षात जशीच्या तशी शिक्के मारून प्रसिद्ध केली. या नियमावलीत ९ मीटर खालील रस्त्यांवर टीडीआर नसल्याचेच सांगण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील जुन्या नाशिकचा गावठाणाचा भाग हा विकासापासून कोसोदूर राहणार आहे. याशिवाय कपाटाच्या मुद्दा देखील भिजत राहणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहराची घोर निराशा केली आहे. दिलेला शब्द पाळण्याची नियत असेल तर मुख्यमंत्र्यांनी या नियमावलीचा पुनर्विचार करून सदर शहर नियंत्रण विकास नियमावलीतील जाचक अटी रद्द करून नाशिककरांना दिलासा द्यावा आणि हे करायचे नसेल तर नाशिककरांचा विश्वासघात केला हे मान्य करावे, असे आमदार जयवंतराव जाधव यांनी शेवटी म्हटले आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.