पीओपी गणेश मूर्तीचे इको फ्रेंडली विसर्जन करण्यासाठी अमोनियम बायकाबरेनेट पावडर मोफत

प्लॅस्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीचे इको फ्रेंडली विसर्जन करण्यासाठी अमोनियम बायकाबरेनेट पावडर मोफत

नाशिक : प्रतिनिधी

प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून  तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे इको फ्रेंडली विसर्जन करता यावे या करिता अमोनियम बायकाबरेनेट पावडर मोफत देण्यासाठी  पालवी फाउंडेशन आणि रेन्बो फाउंडेशन संस्थांनी पुढाकार  घेतला आहे. याकरिता  शहरातील आठ केंद्रांवर मोफत पावडर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दहा दिवसांचे गणेश विसर्जन अगदी जवळ आले आहे. तर दक्षिण गंगा अशी ओळख असलेल्या शहरातील गोदावरी, तसेच इतर नद्यांचे व पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी पालवी फाउंडेशन व रेनबो फाउंडेशन या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. प्लॅस्टर ऑफ परिसच्या गणेशमूर्ती अनेक दिवस नदीच्या पाण्यात, तसेच जल-स्त्रोतांमध्ये पडून राहातात. प्लॅस्टर ऑफ पॅरिस अनेक महिने विरघळत नाही, तर त्यास लावण्यात आलेल्या रासायनिक रंगामुळे पाण्याचे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते, तसेच अनेक दिवस या मूर्ती पाण्यात अडकून पडल्याने मूर्तीची अवहेलना होते.

यातून एक मार्ग मार्ग पालवी आणि  रेन्बो फाउंडेशन या संस्थांनी उपलब्ध करून दिला आहे. या संस्थांनी पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत सुमारे दीड वर्षे संशोधन करून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळवण्यात यश मिळवले आहे. त्यानुसार पाण्यात अमोनियम बायकाबरेनेटचे मिश्रण करून त्यात मूर्ती बुडवून ठेवल्यास मूर्ती २ दिवसांत विरघळतात तर  पोलीस मुख्यालय, तसेच एचपीटी महाविद्यालय येथील पाच दिवसांच्या गणेशांचे विसर्जन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थित हस्ते पाणी व अमोनियम बायकाबरेनेटच्या मिश्रणात करून दाखविण्यात आले आहे. याद्वारे नाशिककरांनी अगदी सहज सोप्या पद्धतीचा वापर करून इकोफ्रेंडली गणेश विसर्जन करण्याचे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.