ylliX - Online Advertising Network

पार्श्वभूमीवर हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का ? असा सवाल राज ठाकरे

राज ठाकरे

– कोरोनाचा विळखा देशात जवळपास सर्वच राज्यांमध्ये आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणूने आपले हात पाय पसरले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात देशातील अत्यावश्यक सुविधा सोडल्या, तर धार्मिक स्थळांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.MNS Adhikrut – मनसे अधिकृत✔@mnsadhikrut

#राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रदिन #मनसे #RajThackeray #MaharashtraDharma #maharashtraday

“कोरोना संचारबंदीत जर हिंदूंनी आपले सण घरात साजरे केलेत तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का दिली जाते? ह्या कोरोनाच्या संकटात धार्मिक तेढ निर्माण 
होऊ नये ह्याची काळजी सरकारने घ्यावी.” - मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे

820Twitter Ads info and privacy152 people are talking about this

लॉकडाऊन दरम्यान हिंदूंनीही रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती आणि गुढीपाडवादेखील घरातच साजरा केला. याच पार्श्वभूमीवर हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का ? असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

राज ठाकरेंनी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना संचारबंदीत जर हिंदूंनी आपले सण घरात साजरे केलेत तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का दिली जाते ? ज्या कोरोनाच्या संकटात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये ह्याची काळजी सरकारने घ्यावी, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.MNS Adhikrut – मनसे अधिकृत@mnsadhikrut

#राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रदिन #मनसे #RajThackeray #MaharashtraDharma #maharashtraday

View image on Twitter

285Twitter Ads info and privacy41 people are talking about this

मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट ‘मनसे अधिकृत’वर राज यांनी, देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनवरूनही चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात ट्विट करत, कोरोना टाळेबंदीमुळे देशात-राज्यात कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतील. अनेक लोकं भुकेने बेजार झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रचंड चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, टीव्ही माध्यमं ह्या सर्वांचा विचार सरकार करणार का असा सवाल सरकारला केला आहे

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.