निचांकी तापमान निफाडमध्ये ४.८ तर नाशिकमध्ये ७.२ एवढे नोंदवले

नाशिक : लासलगांव वार्ताहर – गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडीचा तडाखा निफाड तालुक्यामध्ये चांगलाच जाणवू लागला आहे गेल्या चार दिवसांपासून तापमानामध्ये चांगलीच घट झाली आहे. आज निफाड मध्ये 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज मोसमातील सर्वाधिक निचांकी तापमान निफाडमध्ये ४.८ तर नाशिकमध्ये ७.२ एवढे नोंदवले गेले. गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक ११.२ अंशावर होते मात्र काल ८.८ अंश सेल्सियस झाले होते. आज मात्र कमालीचा पारा घसरला असून पारा 7.2 अंशांवर स्थिरावला आहे. या हंगामातले हे सर्वात कमी ४.८ अंश सेल्सिअस किमान तपमान झाले आहे त्यामुळे निफाड येथील कृषी संशोधन केंद्रातील गहू पिकांवर मोठ्या प्रमाणात दविबंदू जमा झाले आहेत. त्यामुळे थंडीने हरभरा व गव्हाच्या पिकाला मोठा फायदा होणार आहे. थंडीचा तडाखा अजून जर वाढला तर नुकतीच फुगवन येथे त्यामुळे द्राक्षमन्यांना तडे जाण्याची भीती द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली आहे .

मागील आठवड्यात गायब झालेली थंडी पुन्हा सक्रिय झाल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण असेच राहणार असल्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. वातावरणात सातत्याने चढ-उतार होत असल्याने लहान मुलांना ज्येष्ठ ,नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.