नाशिकच्या मराठा क्रांती मोर्चात वारकरी लहाणू पाटील पेखळे करणार व्यसनमुक्तीचे प्रबोधन

नाशिक : शनिवार २४ तारखेला नाशिकला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात माडसांगवी (ता.नाशिक) येथील लहानू पाटील पेखळे हे वारकरी मोर्चेकरी नागरिकांत मिसळून व्यसनमुक्तीचे फलक दाखवून, पत्रक देवून प्रबोधन करणार आहे. विडी, सिगारेट, गुटखा, दारू या आयुष्याला संपवणाऱ्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मराठा समाजाला आता व्यसनमुक्ती कडे ओढण्यासाठी कमालीचे प्रयत्न मराठा समाजाच्या वतीने करण्याची नितांत गरज आहे. आपल्या हक्कासाठी मराठा क्रांती मोर्चात आपण लाखोंच्या संखेने एकत्र झालोय, आता कायमस्वरूपी आपल्या पुढील पिढीला व्यसनमुक्त करण्याची नितांत गरज आहे. याकामी आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे वारकरी संप्रदायाचे जेष्ठ वारकरी संत निवृत्तीनाथ महाराज व्यसनमुक्ती प्रबोधन मंडळाचे लहानू पाटील पेखळे यांनी सांगितले.

वारकरी प्रबोधन मराठा क्रांती मोर्चा
वारकरी संप्रदायाचे जेष्ठ वारकरी संत निवृत्तीनाथ महाराज व्यसनमुक्ती प्रबोधन मंडळाचे लहानू पाटील पेखळे

माडसांगवी येथील लहानू पाटील पेखळे गेली अनेक वर्षे पायी वारी दिंडी करतात .त्यांच्या माध्यमातून वारी, दिंडीत, तसेच यात्रेत व्यसनमुक्तीचे प्रबोधन गेली अनेक वर्षे सुरु आहे. महाराष्ट्र ही साधू संतांची, छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या भूमीत सध्या माजलेली व्यसनाधीनता ही मोठी समस्या बनली आहे. आपण केवळ विकासाच्या बाता मारतो, आपल्याला व्यसनमुक्तीसाठी झोकून द्यावे लागेल, व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. समाजात अशांतता माजली आहे, मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनी होत आहे, सध्या वाढती व्यसनाधीनता सर्वच समाजाला लागलेली कीड आहे, मराठा समाज ही त्यात मागे नाही आता तर गावोगावी व्यसनाधीनतेचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. कारण व्यसनाला राजाश्रय मिळत असल्याने महाराष्ट्र दारूराष्ट्र झाले आहे. एकीकडे म्हणायचे गुटखाबंदी गुटखा विक्री मात्र कमालीची सुरु आहे. गुटख्याच्या नावाखाली अनेक ब्रँड बाजारात सहज मिळतात हे दुर्दैव आहे. दुसरीकडे दारूचे परवाने मिळवणे शासनाने सुलभ केले आहे. व्यसनमुक्ती कार्यक्रम कागदावर आहे. अश्या स्थितीत व्यसनाधिनता घालवायची तर सातत्याने व्यसनाचे भयंकर दुष्परीनामावर गांभीर्याने संवाद करावा लागेल, प्रबोधन कराव लागेल याकामी वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर प्रयत्नशील आहेच, त्यांच्या सानिध्यात आम्ही हि नाशिक जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी सतत प्रयत्नशील आहे. आव्हाने खूप असली तरी स्वस्थ बसून चालणे हा आपला पिंड नाही. याकामी मराठा क्रांती मोर्चाच्या आधी व मोर्चा संपल्यावर वारकरी संतांच्या विचाराने उपस्थित “मराठा बांधवांनो व्यसनमुक्त व्हा, छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र वाचा” असा संदेश देण्याचे काम केले जाणार आहे, अशी माहिती व्यसनमुक्ती चळवळीतील जेष्ठ वारकरी लहानू पाटील पेखळे यांनी दिली आहे. मराठा मूक मोर्चात कोनही हि व्यसन करून येवू नये, व्यसनाचे बळी असाल तर मोर्चा नंतर ते व्यसन कायमचे सोडून दया याची खबरदारी घ्यावी, असे मराठा मूक मोर्चाच्या बैठकांत वारंवार सांगण्यात आले आहे.

दरम्यान मराठा मुक मोर्चात नाशिक जिल्ह्यातील वारकरी बांधवानी आपला वारकरी वेशभूषेत यावे, खांद्यावर भगवी पताका घेवून मराठा मुकमोर्चात सामील व्हावे असे आवाहन संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष त्रंबकराव गायकवाड, वारकरी महामंडळाचे सचिव पुंडलिकराव थेटे, संत निवृत्तीनाथ महाराज व्यसनमुक्ती प्रबोधन मंडळाचे प्रमुख लहानूपाटील पेखळे यांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “नाशिकच्या मराठा क्रांती मोर्चात वारकरी लहाणू पाटील पेखळे करणार व्यसनमुक्तीचे प्रबोधन

  1. nashikonweb च्या बातम्यांना मानाचा मुजरा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.