पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर याची उपस्थिती
नाशिक : महाराष्ट्र राज्य शेळीपालन महासंघाच्या वतीने येत्या रविवारी दि. १८ सप्टेंबर २०१६ रोजी शेवंता लाॅन्स, नांदूर नाका, नाशिक येथे राज्यस्तरीय शेळीपालन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहे.
शेळीपालन हा महत्वाचा शेती पूरक व्यवसाय आहे. शेतकरी वर्गाला त्याचे पशू कसे पाळावे आणि त्या संधर्भात माहिती व्हावी या करीता एका उत्सवा अंतर्गत या चर्चासत्रामध्ये अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय शेळीपालन चर्चासत्रामध्ये शेळ्यांचे आहार व्यवस्थापन (डाॅ. सचिन टेकाडे), शेळी निर्यात स्थानिक बाजारपेठ मार्गदर्शन (अॅड. शिवाजी सानप, महेंद्र शितोळे) गाभण शेळी लहान करडांचे व्यवस्थापन (डाॅ. प्रदीप साळवे), शेळ्यांचे लसीकरण जंत निर्मूलन (डाॅ. मिलिंद भणगे), शेडनिर्मिती, शेळ्यांचे आजार आणि उपचार (डाॅ. परमेश्वर कायंदे), शेळीपालनात स्थानिक जातीचे महत्त्व (डाॅ. संजय मंडकमाले), शेळीचे दैनंदिन व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र (डाॅ. हनुमंत आगे), शेळ्यांच्या जाती, निवड आणि विक्री व्यवस्थापन (डाॅ. एस. व्ही. सय्यद), शासनाच्या गोट फार्मसाठी योजना आणि अर्थसहाय्य (डाॅ. शहाजी देशमुख), या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.