नाशिक (दि.२८) – भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. याबद्दल तातडीने जाहीर मागावी अन्यथा तुषार भोसले यांना नाशिक शहरात फिरू न देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विरोधात भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी आपली पातळी सोडत अतिशय हीन दर्जाची टिका सोशल मिडीयावर केली. भोसले यांनी केलेली टिका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरण हाताळत असलेले अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो मधील अधिकारी समीर वानखेडे हे यांच्या विरोधारातील पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते ना.नवाब मलिक यांनी माध्यमासमोर आणल्यानंतर भाजपाला या प्रकरणात आगपाखड होण्याचे कारण नसताना केवळ विरोधाला विरोध करत आहे. आपले पक्षप्रेम सिद्ध करून आपली वफादारी दाखविण्यासाठी लहान उंचीचे व्यक्तिमत्व असलेले तुषार भोसले यांनी सोशल मिडीयाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्यावर केलेल्या टिकेमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करत तुषार भोसले यांच्या घरी समज देण्यासाठी गेले. परंतु ते भीतीपोटी घर सोडून फरार असल्याने आहे त्या ठिकाणावरून त्यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना नाशिक शहरात फिरू न देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी दिला आहे.