ylliX - Online Advertising Network

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेच्या सुचना

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेच्या सुचना

हवामान खात्याने  मध्य  महाराष्ट्रात येत्या 24 तासात जोरदार  पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला असल्याने  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्फे नागरीकांना सतर्क रहण्याच्या सूचना देण्यात आल्या  आहेत.

धरण परीसरात पडणारा  पाऊस व धरणाच्या  खालच्या बाजूस पडणाऱ्या पावसामुळे नाले, ओढे, ओहोळ, छोटी-मोठी गटारे, नदीपात्र यामध्ये पुराचे  पाणी  येण्याची  दाट शक्यता आहे. त्यामुळे पावसाचेवेळी नागरिकांनी सतर्क रहावे. लहान मुले, विद्यार्थी, नागरिक यांनी पुराचे पाणी  पाहण्यासाठी जाऊ नये. तसेच नदी काठावर तसेच पुलांवर गर्दी करु नये.

पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत. वाहने, जनावरे यांना पुराचे पाण्यापासून दुर ठेवावे. पुराच्या पाण्याचे संपर्कात  आलेले व उघड्यावरील अन्नपदार्थ खऊ नये. सर्व प्रकारच्या विद्युत तारा व विद्युत  खांबापासून दूर रहावे. पाण्यातील विद्युत खांब, तारा व विद्युत उपकरणांना  हात लावू नये.

पुराची ठिकाणे, पुलांवर, नदी, ओढे, नाले, धरणे, धबधबे इ. कोणत्याही  धोकेदायक ठिकाणी  सेल्फी  काढण्यास जावू नये. धार्मिक यात्रा व पर्यटनासाठी  जाणाऱ्या प्रत्येक भाविक आणि पर्यटकाने आपत्ती  व्यवस्थापन  नियंत्रण कक्षात पर्यटनाची माहिती द्यावी म्हणजे त्यांचे  अडचणीच्या वेळी  मदत करणे जिल्हा प्रशासनास शक्य होईल.

 नागरिकांनी अधिक माहितीसाठी  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष (टोल फ्री-1077, दुरध्वनी -2315080/2317151), नाशिक शहर पोलीस नियंत्रण कक्ष-(टोल फ्री क्र.-100,दुरध्वनी-0253-2305233/2305201/2305200), पोलीस नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्ष (दुरध्वनी : 0253-2309715/2309718/2309700/2303088) नाशिक शहरातील पाणी  साचणे ,तुबंणे,वृक्ष किंवा इमारत  कोसळणे, सर्व प्रकारची शोध व बचावासाठी  नाशिक महानगर पालिका नाशिक नियंत्रण कक्ष (दुरध्वनी क्र. 2222413/2571872) अग्निशमन  विभाग (दुरध्वनी क्र. 0253-2590871/2592101/2592102) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  विभागातर्फे करण्यात आले आहे.

महापालिकेतर्फे आवाहन :

गुरुवार दिनांक 13/07/2017 रात्री पासुन नाशिक शहर व परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे गंगापुर धरण व आळंदी धरणाच्या खालील भागांमध्ये (फ्री कॅचमेंट एरीया) पावसाचे प्रमाण वाढत असल्याने  व तेथुन प्रवाहीत होणारा पाण्याचा प्रवाह हा गोदावरी नदीस येऊन मिळत असल्याने गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी सर्व संबंधित अधिका­यांना आपत्कालीन परिस्थितीत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

तसेच प्रामुख्याने शहरातील पुरामुळे बाधीत होणा­या गोदावरी घाट परिसर, सातपुर रोड, नासर्डी नदी परिसर इ. सारख्या विविध भागात पहाणी करुन संबंधित खातेप्रमुखांना तातडीने कामे करण्याच्या सुचना दिल्या असुन रस्त्यांवर कुठेही पाणी साठणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे बाधीत होणा­या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असुन नदीकिनारी बाधीत होणा­या क्षेत्रातील/परिसरातील सर्व विभागीय अधिका­यांना ध्वनीक्षेपकाव्दारे नागरिकांना सावधानतेचा ईशारा देणेस सांगण्यात आले आहे. तसेच आवश्यकता भासल्यास सदर ठिकाणी बाधीत होणा­या नागरिकांना महानगरपालिकेच्या निश्चित केलेल्या शाळांमध्ये  तसेच समाजमंदिरांमध्ये हलविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील विविध भागात पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सतर्क व सज्ज आहे तसेच कुठलीही वित्तहानी अथवा जिवितहानी होऊ नये या दृष्टीने मनपाच्या माध्यमातुन उपाययोजना करण्यात आलेले आहेत. या परिस्थितीत नाशिक महानगरपालिकेमार्फत आपत्कालीन कक्ष 24 तास सुरु असुन नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत 0523-2571872, 0253-2317505, 0253-2222413 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.