ylliX - Online Advertising Network

कांदा निर्यातदारांना सुमारे ७५० कोटींचा फटका

नाशिक : प्रतिनिधी कांदा निर्यात जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी निर्यातीसाठी पाठविण्यात आलेला कांदा अडविण्यात आला. पुढे मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर अडकलेल्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली. मात्र अडकलेल्यापैकी ३० टक्के कांदा निर्यातीसाठी रवाना झाला. उरलेल्या ७० टक्के कांद्यातील निम्म्याहून अधिक कांदा सडल्याने जवळपास ७५० कोटींचा फटका व्यापाऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज निर्यातदारांकडून वर्तविण्यात आला.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या बंदरात चार लाख टन कांदा पडून असल्याची माहिती दिली होती. त्याच वेळी बांगलादेश, नेपाळ, भूतानच्या सीमेवर सहाशेहून अधिक ट्रकभर कांदा अडकून पडला होता. केंद्राने १३ सप्टेंबरच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा केल्यानंतर निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार तीन लाख टनांपैकी ८० टक्के म्हणजेच, सव्वादोन लाख टन कांदा खराब झाला. ३० हजार रुपये टन या भावाचा विचार करता, हा फटका पावणेसातशे कोटींपर्यंत पोचतो. सीमेवरील उभ्या असलेल्या ट्रकसाठी दिवसाला तीन हजार रुपये अतिरिक्त भाड्याचा भुर्दंड व्यापाऱ्यांना सोसावा लागला आहे. त्याचप्रमाणे बंदरात ‘डिटेशन्स चार्ज’, बंदरातील कंटेनरसाठी प्लगिंग शुल्क, जागाभाडे, अपलोडिंग शुल्क अशी जहाज कंपन्यांनी ७० कोटींपर्यंतची केलेली आकारणी देण्याखेरीज पर्याय उरलेला नाही, असेही निर्यातदार सांगत आहेत .
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.