कांदा उत्पादकांची मागणी पूर्ण, मिळाली अतिरिक्त रेल्वे रेक
नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकमधील कांदा उत्पादकांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे अतिरिक्त रेल्वे रेक उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. सोमवारी सदरची मागणी रेल्वेमंत्र्यांनी मान्य केली असून सोमवारपासून दररोज आणखी एक रेक उपलब्ध करून दिली आहे. सध्या दररोज चार रेक दिल्या जात आहेत. मात्र यंदा कांद्याचं भरघोस पीक आलं असून, त्याची वाहतूक करण्यासाठी अधिक रेल्वे रेक मिळण्याची मागणी कांदा उत्पादकांकडून करण्यात आली होती. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. नाशिक जिल्ह्यातून कांदा पूर्व, उत्तर, ईशान्य आणि पूर्वेकडील किनारी भागात पाठवला जाणार आहे. यामुळे कांदा निर्यात करण्यासाठी मोठी मदत होणार असून कांदाउत्पादकांना मोठा फायदा होणार आहे.