नाशिक जिल्हा परिषद मतदान नोंद सुद्धा उत्तम जाहली असून जवळपास ६८ टक्के मतदान नोंद झाली आहे. तर मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या 73 गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या 146 गणांमधून ऐकूण 1 हजार 11 उमेदवारांचे भवितव्य २३ तारखेला समजणार आहे.जिल्ह्यात सुमारे 2 हजार 646 मतदान केंद्रांवर 17 हजार 340 कर्मचार्यांच्या मदतीने मतदान पार पडले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय (पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी-
रायगड- 71, रत्नागिरी- 64, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 68, पुणे- 70, सातारा- 70, सांगली- 65, सोलापूर- 68, कोल्हापूर- 70, अमरावती- 67 आणि गडचिरोली- 68. सरासरी- 69.43.
राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारी राज्यात सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील 4 पंचायत समित्या आणि त्याअंतर्गतच्या निवडणूक विभागात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. यवतमाळ जिल्हा परिषदेचे 6 निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या 12 निर्वाचक गणांत 73 टक्के; तर वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या 4 निर्वाचक गणांत 68.99 टक्के मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांत सरासरी 52 टक्के; तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सरासरी 68.99 टक्के मतदान झाले होते.