जिल्हा परिषद विषय समिती निवडणूक प्रचंड गोंधळ तर विरोधक विजयी

 नाशिक जिल्हा परिषदेतील विषय समितीच्या निवडणुकीवेळी सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की मोठा गोंधळ घातला आहे.  काँग्रेसचा एक गट फुटून भाजप-राष्ट्रवादीला मिळाल्यानं जिल्हा परिषद सदस्यांची पळवापळवी झाली आहेत तर दुसऱ्या बाजूस सुरु असलेल्या या   धक्काबुक्कीत काही महिला सदस्यही जखमी झाल्या आहेत.

 या निवडणुकीवर शिवसेना-काँग्रेसनं या निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. काँग्रेसचे आठ पैकी तीन सदस्य गळाला लावण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या 2 समित्या आणि 2 विषय समित्यांवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बंडखोरांची सत्ता आली आहे. सेना-काँग्रेसने बहिष्कार टाकल्यामुळं राष्ट्रवादीच्या अपर्णा खोसकर यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी, तर काँग्रेसच्या बंडखोर गटातील सुनिता चारोस्कर यांची समाजकल्याण सभापतीपदी निवड झाली. भाजपाच्या मनिषा रत्नाकर पवार आणि राष्ट्रवादीच्या यतिन पगार यांची विषय समितीवर निवड झाली आहे.

महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अर्पणा खोसकर यांचा विजय 39 मतांनी झाला.  महिला बाल कल्याण समिती सभापतीपदाची  राष्ट्रवादी आणि भाजपच्या सदस्यांनी मतदान करून विजयी केले. आरोग्य-शिक्षण, कृषी-पशू संवर्धन या दोन विषय समित्यांसाठी राष्ट्रवादी-भाजपकडून मनिषा पवार आणि यतीन पगार हे उमेदवार होते.  या दोन्ही समित्यांवर अनुक्रमे मनिषा पवार आणि यतीन पगार यांनी 39-39 मतांनी विजय संपादन केला.या  सर्व निवडणुका अत्यंत गोंधळात पूर्ण झाल्या असून त्यामुळे पोलिसांना देखील बोलाव लागल होते.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “जिल्हा परिषद विषय समिती निवडणूक प्रचंड गोंधळ तर विरोधक विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.