नाशिककरांनो उद्या, रविवारी अनुभवा शून्य सावली दिवस- झिरो शाडो डे Zero Shadow

दुपारच्या वेळी सूर्य डोक्यावर येतो असे म्हटले जाते मात्र वर्षातील दोनच दिवस सूर्य नेमका डोक्यावर येत असतो. सूर्य डोक्यावर असला की सावली आपली साथ सोडत असते. त्यालाच शून्य सावली म्हणतात. असाच अनुभव नाशिककरांना उद्या म्हणजेच रविवारी (दि. 20) घेता येणार आहे. Zero Shadow Nashik City

काय असते शून्य सावली?

Zero Shadow Nashik City, नाशिककर रविवारी अनुभवा शून्य सावली दिवस- झिरो शाडो डे, nashik latitude and longitude 19.9975° N, 73.7898° E, नाशिक शहर मालेगाव जळगाव मनमाड malegaon manmad jalgaon पुणे औरंगाबाद नागपूर यवतमाळ pune aurangabad nagpur yavatmal nashikonweb Geographical conditions भौगोलिक परिस्थिती
Image : Skymet Weather

सावली कधीच आपली साथ सोडत नाही, ती सदैव आपल्याबरोबरच असते, असे म्हटले जात असले, तरी ही भौगोलिक स्थितीमुळे वर्षांतून दोनदा निश्चितपणे आपली साथ सोडते. पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून तो साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. सूर्य रोज थोडासा उत्तर-दक्षिणेकडे असतो. त्यामुळेच ऋतू बदलण्याची प्रक्रियाही होत असते. Zero Shadow Nashik City

तर दररोज सूर्योदयाची किंवा सूर्यास्ताची क्षितिजावरची जागा बदलत असते. २३ डिसेंबर ते २१ जून सूर्याचे उत्तरायण असते, तर त्यानंतर दक्षिणायन सुरू होते. या दरम्यान दोन दिवस असे येतात की त्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली येते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते. Zero Shadow Nashik City

रविवारी (दि. 21) अनुभवा शून्य सावली

राज्यात 7 मे पासून विविध ठिकाणी शून्य सावलीचा रोमांचक अनुभव नागरिक घेत असून, पुणेकरांना 14 मे रोजी झिरो शाडोची अनुभूती मिळाली आहे. तर नाशिककरांना 20 मे रोजी हे अनुभवयास मिळेल. सूर्य रोज थोडासा उत्तर-दक्षिणेकडे असतो. त्यामुळे हा क्षण आपल्याला रोज अनुभवता येत नाही. Zero Shadow Nashik City

पुण्याचे अक्षांश 18.5 असल्याने सूर्याने 14 मेस मध्यावर होता. नाशिकचा अक्षांश 19.99 असल्यामुळे रविवारी दुपारी 12 वाजेनंतर आपली सावली गायब होणार आहे.

नाशिकसोबत या शहरात 21 मे नंतर झिरो शाडो

औरंगाबाद, नाशिक (20 मे), मनमाड (21 मे), यवतमाळ (22 मे), बुलडाणा, मालेगाव (23 मे), अकोला (24 मे), अमरावती (25 मे), नागपूर, भुसावळ, जळगाव (26 मे)

सूर्य 21 जूनपर्यंत कर्कवृत्तापर्यंत प्रवास करून दक्षिणेला परत फिरला की 21 जुलैला ही घटना पुन्हा घडते. परंतु, या वेळेस भारतात पावसाळा असल्याने आपल्याला त्यावेळेस याचे निरीक्षण करता येत नाही. Zero Shadow Nashik City

Zero Shadow Nashik City

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.