youtube vs tiktok कॅरी मिनाटी काय प्रकरण आहे?

CarryMinati हा भारतातील किशोरवयीन मुलांमध्ये विशेष प्रसिद्ध असलेला दिल्लीचा 20 वर्षीय युट्युबर आहे. त्याचं खरं नाव अजय नागर आहे. मे 2020 मध्ये त्याची युट्यूब द्वारे वार्षिक कमाई 40 लाख रुपये इतकी होती. सामान्यतः तो त्याच्या व्हिडिओ मध्ये सोशल मीडिया वर वायरल होणाऱ्या गोष्टींची टवाळी करत असतो व असं करताना बऱ्याचदा तो अश्लाघ्य भाषा वापरतो. 2015 च्या नंतर तो विशेष प्रसिद्ध झाला (धन्यवाद जिओ) युट्युब वर त्याचे 18 मिलियन म्हणजेच 18000000 (अठरा दशलक्ष) सभासद असून त्याचं दुसरं एक चॅनेल आहे जिथे तो लाईव्ह येऊन गेम खेळतो व तिथेही टवाळी करतो..इंटरनेट च्या पॉप्युलर भाषेत त्याला रोस्ट म्हटलं जातं youtube vs tiktok

आता वळूया प्रकरणाकडे.

टिक टॉक या प्रसिद्ध अँप वर काही लोक अतिशय वाईट विडिओ बनवत असतात अगदी काही पुरुष साडी नेसून किंवा त्याहीपेक्षा वाईट..युट्युबवर यातील काही विडिओ पाहायला नक्की मिळतील.

तर एकूणच कॅरी मीनाटी बऱ्याचदा या टिक टॉक वाल्यांना भयंकर रोस्ट करत असतो. हे पाहून टिक टॉक फेम आमिर सिद्धकी याने एक व्हिडिओ अपलोड करून त्यात यावर टीका केली.

मग सुरू झालं युद्ध.

कॅरी च्या फॅन्स नी कॅरी ला यावर उत्तर द्यावे म्हणून गळ घातली.. शेवटी त्याने विडिओ बनवला व आमिर सिद्धकी आणि एकंदरीत टिक टॉक ला बरंच भाजलं.. अगदी टिक टॉक वाले पुरुष हे पुरुष नसून स्त्री किंवा तृतीयपंथी आहेत असं चित्र त्याने निर्माण केलं

हा व्हिडीओ एवढा गाजला की अल्पावधीतच त्याला 62 मिलियन लोकांनी पसंदी दर्शवली. अगदी अल्पावधीत आजतागायत एवढा कोणताच विडिओ वायरल झाला नव्हता.

त्यानंतर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यांच्याबद्दल मीम्स वायरल होऊ लागले.

अमीर सिद्धकी ने याबाबत तक्रार केली आणि युट्युब ने कॅरी चा विडिओ काढून टाकला.

तोपर्यंत वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या प्रथेनुसार बऱ्याच युट्युबरनी या विषयावर व्हिडीओ बनवून हा विषय अधिक गरम केला.

त्यानंतर अचानक ह्यात फेमस युट्युबर टेक्निकल गुरुजी (हा माणूस मोबाईलचे रिव्ह्यू करतो) यांनी एक व्हिडिओ बनवला ज्यात त्यांनी काही न बोलता मोबाईल मधून टिक टॉक अँप काढून टाकले.

आणि मग सोशल मीडियावर टिक टॉक ला बॅन करा हा ट्रेंड सुरू झाला.. आठवड्याभरपूर्वी प्ले स्टोअर वर 5 पैकी 4.6 गुण असलेला हा अँप सध्या 1.2 इतकी रेटिंग घेऊन खाली पडला आहे.. त्यात ते एक चिनी अँप असल्याचा राग देखील लोकांना आहेच.

माझं मत- हे सगळं ठरवून केलेलं असू शकतं. सध्या लॉक डाऊन मुळे कोणीच घराबाहेर पडून विडिओ बनवू शकत नाहीये त्यामुळे आपले सभासद वाढवण्यासाठी केलेली ही युक्ती असू शकते. या विडिओ ने कॅरी चे 5 लाख सभासद वाढले तर आमिर सिद्धीकी व इतर टिक टॉक वाले देखील प्रसिद्ध झालेyoutube vs tiktok

य, सोशल मीडियावर सध्या युट्यूब विरूद्ध टिक टॉक ट्रेंड होतेय. सोबत  कॅरी मिनाटी हे नाव तर जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे. याचे कारण म्हणजे, कॅरीने  एक व्हिडीओ शेअर केला आणि सोशल मीडियाव टिक टॉक विरूद्ध युट्यूब हे युद्ध रंगले. पाठोपाठ या युद्धावरच्या भन्नाट मीम्सचा जणू पूर आला.
आता या युद्धाला तोंड फोडणारा आणि सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंडमध्ये असणारा कॅरी कोण हे जरा जाणून घेऊ या…
तसे नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवरCarryMinati और ​​CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत़
युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण  सोडले. होय, अगदी 12 वी परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा.
अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.
वयाच्या 10 व्या वर्षापासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले होते. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. 2014 मध्ये त्याने कॅरीमिनिटी हे मूळ युट्यूब चॅनल सुरु केले. 2017 मध्ये CarryIsLive आणखी एक युट्यूब चॅनल उघडले.
कॅरीने जानेवारी 2019 मध्ये युट्यूबपर Pewdiepie विरोधात ‘Bye Pewdiepie’ नावाने एक डिस गाणे साद केले होते. ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. 24 तासांत या गाण्याला 5 मिलियन व्ह्युज मिळाले होते.  2019 या सालात टाईम मॅगझिनद्वारा नेक्स्ट जनरेशन लीडर्स 2019 व्या यादीत कॅरी दहाव्या क्रमांकावर होता. इनोव्हेटिव्ह करिअर करणा-या युवांची ही यादी टाईम मॅगझिन दरवर्षी प्रसिद्ध करते.youtube vs tiktok

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.