नाशिकरोड : येथील मध्यवर्ती कारागृहालगत असलेल्या मंगलमुर्ती नगर वस्तीत हळदीच्या कार्यक्रमात डिजेच्या संगीतावर नाचताना दोन गटांत वाद होऊन त्याचे पर्यावसान एकाच्या खुनात झाले आहे. रोहित बाळू वाघ असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो रिपाइं (आठवले गट) पक्षाचा युवा नेता म्हणून राजकारणात सक्रीय होता. जुन्या वादातून त्याचा खून झाल्याचा दावा करण्यात येत आहे. youth murdered nashik road rpi young leader politics
रविवारी (दि. 27) झालेल्या या हल्ल्यात मृत्यू झालेला तरुण माजी नगरसेवक सुनील वाघ यांचा पुतण्या होता. त्याच्यावर सहा ते आठ जनाच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. या घटनेतील सर्व हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे उपनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले. यापैकी 6 ते 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन दिवसातील दुसरा खून
कॅनाॅल लागत असलेल्या या झोपडपट्टीत सलग दुस-या दिवशी खुनाची घटना घडली आहे. दुसरा खून राजकीय संबंधित असल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी रिपाइंच्या पदाधिका-यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.