कौटुंबिक कलहातून लहान भावाने मोठ्या भावाचा केला खून

लासलगाव (समीर पठाण) : कौटुंबिक कलहातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना विंचुर येथे घडली. ही थरारक घटना रविवारी सकाळी विंचुर – डोंगरगांव रस्त्यावर  घडली. भागवत रामदास पालवे (वय ४०)असे मृताचे, तर संतोष रामदास पालवे (वय ३८) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. younger brother kill elder brother family issue lasalgoan

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की डोंगरगांव येथील रहिवासी भागवत रामदास पालवे हे त्यांचे लहान बंधु संतोष रामदास पालवे यांना घरी येऊ देत नव्हते. याचाच मनात राग धरून संतोष ने आपल्या मोठ्या बंधूला विंचूर- डोंगरगाव रस्त्यावर लाकडी फळीने मारहाण केली.

या मारहाणीत भागवत यांच्या डोक्याला जोरात मार लागल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. यांचा आरडाओरडा ऐकूण नागरिक गोळा झाले. जखमी भागवत रामदास पालवे यांना नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली असून आरोपी संतोष रामदास पालवे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सह्यायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

younger brother kill elder brother family issue lasalgoan

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.