संपूर्ण आरोग्यासाठी योगशास्त्र – स्वामी डाॅ. निर्मलानंद सरस्वती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘योग आणि जीवनशैली’ विषयावर व्याख्यान

योग शास्त्राचा अभ्यास व्यक्तीला शारीरीक, मानसिक, आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवर सजग व कार्यक्षम बनवणारे असल्याने संपूर्ण आरोग्यासाठी योगाभ्यास आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंगेर येथील बिहार योग विद्यालयाच्या स्वामी डाॅ. रामानंद सरस्वती यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाÚयांना ‘योग आणि जीवनशैली’ या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रति-कुलगुरु डाॅ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डाॅ.कालिदास चव्हाण, वित्त व लेखाधिकारी श्री. पंडित गवळी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना स्वामी डाॅ. निर्मलानंद सरस्वती यांनी सांगितले की, व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने योगाचे महत्व अधिक आहे. योगशास्त्र हे पुस्तकातून अभ्यास करुन उपयोगाचे नाही, त्याचा प्रत्यक्ष अभ्यास केल्यास साधकाला प्रत्यक्ष अनुभुती प्राप्त होते असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरु डाॅ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, धकाधकीच्या जीवनात मनःशांती मिळावी यासाठी नियमित योग व प्राणायाम करावा. बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्या आरोग्यावर परिणाम होत असून ताणतणावापासून मुक्ती मिळणेसाठी सर्वांनी योगाभ्यास करणे गरजचे आहे. सुशासन दिनानिमित्त तणाव मुक्ती व्यवस्थापनासाठी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाÚयांकरीता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलसचिव डाॅ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, प्रत्येक कर्मचाÚयाने नियमित योगाभ्यासाचा सराव करावा. विद्यापीठातर्फे देखील योगशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमासच्या सुरवातीला मा. कुलगुरु डाॅ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वामी डाॅ. निर्मलानंद सरस्वती यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा परिचय डाॅ. ज्ञानेश चोपडे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डाॅ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमास श्री. अरुण खोंडे, श्री. नंदकुमार देसाई, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.