येवला : सायगाव महादेव वाडी आदिवासी वस्तीत पाण्याचा गंभीर प्रश्न

येवला तालुक्यातील सायगाव येथील महादेव वाडी (आदिवासी वस्ती) येथे पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.  पाण्याच्या टँकर ची मागणी करूनही सुरु होत नसल्याने येथील आदिवाशी महिलांना काम धंदा सोडून पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.

सलग 35 वर्ष टँकरच्या पाण्यावर तहान भागवीणाऱ्या सायगाव करांची 38 गाव पाणी पुरवठा योजनेचे पाणी गावात आल्यावर टँकर् मुक्ति झाली होती. मात्र या गावा पासून दीड किलोमीटर अंतरावरील आदिवासी  वस्ती असलेल्या  महादेव वाडीला दरवर्षी टँकर् च्या पाण्यावर तहन भागावी लागते आहे.

जवळपास  तीनशे लोकांची ही वस्ती असून बहुतेक जन मिळेल ते काम करतो. या कामावर ते आपला उदरनिर्वाह करतात.  येथे हात पंम्पचाच्या पाण्याचा मोठा आधार असतो, पण दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच पंम्पाचे पानी कमी होते. आता तर बऱ्याच वेळ प्रतीक्षा करुण हंडाभर  पाणी मिळते आहे. मात्र स्त्रियांना उन्हात त्यासाठी दिवस भर वाट बघावी लागते आहे.

या साठी ग्रामपंचयतीने प्रस्ताव् दिला आहे. आमत्र कोणतीही कारवाई  होत नसल्याने येथील माजी प.स. उपसभापति दगु आव्हाड सुदाम मोरे, वारुबाई आव्हाड, तुळसाबाई मोरे, इंदुबाई ख़ुरसने, संगीता सोनवणे, विमल मोरे, परिघा पवार, जन्याबाई माळी, केसरबाई कांबळे, सगीता आव्हाड, उज्वाला मोरे ,साखराबाई माळी ,लता सोनवणे, इंदुबाई आव्हाड, जन्याबाई त्रिभुन, आश्याबाई खुरसने, सह आदि महिलांनी तहशील वर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.