मुक्त विद्यापीठ : प्रवेशासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

मुक्त विद्यापीठ : प्रवेशासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश २१ जुलैपासून सुरु करण्यात आले आहेत. मात्र राज्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता ३१ ऑगस्ट पर्यंत विनाविलंब शुल्कासह असलेली मुदत १५ सप्टेंबर पर्यंत (कृषिविज्ञान विद्याशाखेचे शिक्षणक्रम आणि बी.एड. शिक्षणक्रम वगळून) सर्व शिक्षणक्रमांसाठी वाढविण्यात आली असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.   सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जात असून विद्यार्थ्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या संगणकावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल. विद्यार्थी स्वतः सायबर कॅफेच्या माध्यामतूनही प्रवेश अर्ज भरू शकतात. मुक्त विद्यापीठाची राज्यात ८ विभागीय केंद्रे कार्यरत असून तेथेही प्रवेश घेण्यासाठी मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचण असल्यास ०२५३-२२३०५८० किंवा २२३०७३४ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा मुक्त विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर संपर्क साधावा. विद्यापीठाने दिलेल्या वाढीव प्रवेश मुदतीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.