श्वसन तंत्रामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा

 आर्ट ऑफ लिव्हिंगची लयबद्ध श्वासावर आधारित सुदर्शन क्रिया  करणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा आढळून आल्याचे येल युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, मानसिक आरोग्याच्या सहा स्तरांमध्ये म्हणजेच मानसिक स्वास्थ्य, तणाव, उदासिनता, एकाग्रता, सकारात्मक प्रभाव  आणि सामाजिक संबंधांमध्ये सत्कारात्मक सुधारणा घडून आल्या आहेत. मानसोपचार तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या गटाने हे संशोधन केले आहे. याचे निष्कर्ष  येल युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्यात म्हटले की, युनिव्हर्सिटीच्या आवारातील विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्येवर आर्ट ऑफ लिव्हिंगचा लयबद्ध श्वसन तंत्रावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम रामबाण उपाय ठरला आहे.mental health in students
 
उच्चस्तरीय चाचणी व संशोधनाच्या गटाचे नेतृत्व येल युनिव्हर्सिटीच्या चाइल्ड स्टडी सेंटर, येल  सेंटर फॉर  इमोशनल इंटेलिजन्स,  येल युनिव्हर्सिटी, करुणा आणि परोपकार शोध आणि शिक्षा केंद्र  स्टेन फोर्ड विश्वविद्यालय, जर्मनीतील ल़पझिन विश्वविद्यालय , येल प्रबंधन स्कूल, मेडिकल रिसर्च कौन्सिल  कॉगनिशन अ‍ॅड ब्रेन रिसर्च केंद्र,  केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांंनी केलेले आहे.

सध्याच्या कोरोनासारख्या महामारीमुळे भविष्यातील नव्या बदलांना सामोरे जाताना अनिश्चितता वाढत आहे. त्यात जागतिक पातळीवरील तणाव, आंदोलने या सर्वामुळे काही विशेष वयोगटातील युवक वर्गाच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर येल युनिर्व्हर्सिटीच्या इल्ड स्टडी आणि हेल्थ सेंटर फॉर इमोशनल इंटेलिजन्सच्या टीमने पदवी स्तरावरील 135 विद्यार्थ्यांचा सलग आठ आठवडे अभ्यास केला. या काळात त्यांच्यासाठी  तीन मानसिक स्वास्थ्य प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. विशेष म्हणजे,  या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमात श्वसन तंत्र  आणि भावनात्मक बुद्धिमत्ता यावर विशेष भर देण्यात आला.   प्रशिक्षण घेतलेल्या 135 जणांची अन्य विद्यार्थ्यांशी तुलना करून अभ्यासकांनी निष्कर्ष जाहीर केले आहेत.  
 
  आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एसकेवाय कॅम्पस हॅप्पीनेस प्रोग्रॅम (सुदर्शन क्रिया योग)  या श्वसनावर आधारित प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या सहा स्तरावर परिवर्तन घडून आल्याचे अभ्यासात समोर आले आहे. याबाबत  येल प्रबंधन  स्कूलच्या महिला नेतृत्व कार्यक्रम शाखेच्या संचालक  व लेखिका   एल्मा  सिपाला म्हणतात, मागील दहा वर्षांत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यात बिघाड झाला आहे.   त्यामुळे  कौशल्य शिक्षणाबरोबरच त्यांना  संतुलित जीवन जगण्याची कला  शिकवणे  देखील तितकेच आवश्यक आहे.

काय आहे सुदर्शन क्रिया?

 आर्ट ऑफ लिविंग कार्यक्रमाचा प्रमुख  भाग असलेली  सुदर्शन क्रिया ही एक लयबद्ध श्वसन पद्धती आहे.  नियमित सुदर्शन क्रिया करण्यामुळे पेशीच्या सुक्ष्म स्तरापर्यंत जाऊन तणाव आणि भावनात्मक  विषारी पदार्थांचा निचरा होतो. या पद्धतीमुळे  निद्रा चक्र सुधारते आणि मेंदूमध्ये आनंदी आणि सुखकारक हार्मोन वाढतात.  उदा.  ऑक्सिटोसिन यांचा स्राव वाढतो आणि हानिकारक हार्मोन जसे कार्टीसोलचा स्त्राव थांबण्यास मदत होते. परिणामी जागरुकता वाढून उदासिनता कमी होत असल्याचेही संशोधनात पुढे आल्याचे येल युर्निव्हर्सिटीच्या वेबसाईटवरील वृत्तात  म्हटले आहे.

सकारात्मक परिवर्तनावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब
  भारतातील आध्यत्मिक गुरू श्री श्री रविशंकर निर्मित आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुदर्शन क्रिया योगाने (एसकेवाय कॅम्पस हॅप्पीनेस प्रोग्रॅम ) जगभरात  लक्षावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.  प्रभावी श्वास प्रक्रिया, ध्यान, योग, सामाजिक संबंध आणि सेवाकार्यांचे येल युनिर्व्हर्सिटीच्या आवारातील 135 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा झाली , हे   उच्चस्तरीय अभ्यासामध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंग सुदर्शन क्रियेने सकारात्मक  परिवर्तन होऊ शकते, हे  जागतिक पातळीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होऊन भारताच्या आध्यत्मिक परंपरेचा एक प्रकारे गौरव झाला आहे, अशी प्रतिक्रिया आर्ट ऑफ लिव्हिंगच्या (पुणे) पीआर हेड कुमकुम नरेन यांनी व्यक्त केली. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात हॅप्पीनेस प्रोग्रॅमच्या माध्यमातून अनेकजण मनशांतीचा अनुभव घेत आहेत. तणावमुक्त होऊन मनोबल उंचावण्याबरोबरच नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाल्याची हजारो उदाहरणे आमच्याकडे आहेत. ज्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रोग्रॅम करायचा आहे ते http://www.artofliving.org/ या वेबसाईटवर नाव नोंदणी करू शकतात, असे आवाहन कुमकुम नरेन यांनी केले आहे.


(संपर्क : 9823373897)Yale Study finds, this breathing technique improved mental health in students

Students reported improvements in six areas of well-being: depression, stress, mental health, mindfulness, positive affect, and social connectedness

30 July 2020, Bengaluru:A breakthrough study by researchers from Yale University has found that college students who practiced the Sudarshan Kriya breathing technique, reported improvements in six key areas of well-being: depression, stress, mental health, mindfulness, positive affect, and social connectedness.

The findings, reported in Frontiers in Psychiatry and mentioned on the Yale University website, said ‘such resiliency training programs could be a valuable tool for addressing the mental health crisis on university campuses.’ 

The high profile study was led by researchers from Yale Child Study Center & Yale Center for Emotional Intelligence, Yale University, Center for Compassion and Altruism Research and Education, Stanford University, Leipzig University, Leipzig, Germany, Yale School of Management, Yale University and Medical Research Council Cognition and Brain Sciences Unit, University of Cambridge.

In the ongoing pandemic, youth have been a particularly vulnerable age group when it comes to mental health, matters made worse by uncertainties about the future, rise of protests and global tensions. 

In a randomized controlled trial, the research teams at the Yale Child Study Center and Yale Center for Emotional Intelligence evaluated three classroom-based wellness training programs. All three incorporate breathing and emotional intelligence strategies. The programs were tested on 135 undergraduate subjects for 8 weeks and the results were measured against a controlled group of undergraduates who were not part of any of the three programs. 

Compared to the control group…SKY Campus Happiness showed the greatest impact, benefiting six outcomes: depression, stress, mental health, mindfulness, positive affect and social connectedness,” researchers said. 

The Art of Living’s SKY Campus Happiness program relies on a breathing technique called SKY (Sudarshan Kriya Yoga) Breath Meditation, yoga postures, social connection, and service activities.

“In addition to academic skills, we need to teach students how to live a balanced life,” said Emma Seppälä, lead author and faculty director of the Women’s Leadership Program at Yale School of Management. “Student mental health has been on the decline over the last 10 years.” 

Sudarshan Kriya is a powerful rhythmic breathing technique taught as part of The Art of Living programs, that eliminates stress and emotional toxins at a cellular level. Research shows, the technique helps improve the sleep cycle, improves secretion of happy or feel-good hormones like oxytocin, reduces the secretion of stress hormones like cortisol, heightens awareness, and reduces clinical depression symptoms.  

Anxiety, depression and stress have been some of the most common self-reported problems by university students

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.