yahoo nashik जुन्या पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील “हे” हॉटेल मनपाकडून अनिश्चित काळासाठी बंद.

पालकमंत्री यांनी कालच रस्त्यावर उतरून जनजागृती केली होती. सोबतच अधिकारी वर्गाची बैठक घेत कठोर कारवाई करायच्या सूचना केल्या होत्या. मात्र अनेकदा सूचना करूनही काही आस्थापना जुमानत नव्हत्या, रात्री उशिरा पर्यन्त हॉटेल सुरू ठेऊन नियम भंग करत होते. मात्र आता मुख्यमंत्री यांनी कठोर करवाईचे आदेश दिले त्याचे परिणाम दिसून येत आहेत. असाच मोठा धक्का एका प्रतिथ यश हॉटेलला मनपाने दिला आहे. यामध्ये शरणपुर रोड येथील
जुन्या सिपी ऑफिस पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील हॉटेल याहूवर महापालिकेच्या पथकाने काल रात्री छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. . या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, तसेच विनामास्क गर्दी जमल्याचे दिसताच पालिकेच्या पथकाने अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीच हुज्जत घालण्यात आल्याने हॉटेलवर कठोर कारवाई करीत हे हॉटेलमनपाकडून अनिश्चित काळासाठी बंद. सील करण्यात आले. ही मोठी कारवाई झाली तीमुळे हॉटेल चालक यांना धक्का बसला आहे.yahoo nashik

yahoo nashik
मनपाकडून अनिश्चित काळासाठी बंद करण्याबरोबरच 25 हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या पथकाशी हुज्जत घालण्याचा गंभीर प्रकार घडला असून, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्याशी अरेरावीची भाषा केल्यानंतर हा प्रकार आयुक्त कैलास जाधव यांना कळल्यावर त्यांनी संबंधित हॉटेलला 25 हजार रुपयांचा दंड, तसेच हॉटेल सील करण्याची कारवाई सुरू केली. शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असूून, त्यामुळे शहरात अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत व्यापारी व अन्य आस्थापना सुरू ठेवल्या जात असून, केवळ हॉटेल्स व बारला रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

पन्नास टक्के टेबल सुरू ठेवणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अशा अटी बंधनकारक केल्या होत्या; मात्र त्यांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या.

*खासकरून कॉलेज रोड, गंगापूर रोड, शरणपूर रोड* या भागातील, काका मामाचे हॉटेल सोबतच तसेच मुंबई-आग्रा रोडवरील काही हॉटेलमध्ये गर्दी होत असल्याच्या तक्रारी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी पथके तयार करून रात्री पाहणी करण्यासाठी सांगितले असता हॉटेल याहू या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तपासणीसाठी गेले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे, तसेच 50 टक्के टेबल सुरू ठेवण्याच्या अटींचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. नियमानुसार प्रथम दंड करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पथकातील काही अधिकार्‍यांशी हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी हुज्जत घातल्यामुळे हॉटेल सील करण्यात आले.yahoo nashik

यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव म्हणाले, की हॉटेल व बारमधील नियमांचे उल्लंघन होत असल्याची खातरजमा करण्यासाठी पथक गेल्यानंतर त्या ठिकाणी हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी हुज्जत घातली. त्यामुळे हॉटेलवर कठोर कारवाई करण्यात आली.ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, डीएसआय पाटील, एएसआय राजू गायकवाड, विविध कर विभागाचे सहाय्यक अधीक्षक कातडे यांच्या पथकाने केली.

मनपा आयुक्तांनी यापूर्वीच हॉटेल व बार असोसिएशनला कोरोना बाबतीत लावलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासंदर्भात पत्र दिले होते. तरी शहरातील काही हॉटेल या निर्बंधांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनात येत असून नागरिकांकडून तक्रारी येत असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारची कारवाई या पुढेही सुरूच राहणार असून हॉटेल व बार चालकांनी नियम पाळण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.yahoo nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.