सिन्नर महामार्गावर महिलेचा विवस्त्र मृतदेह

सिन्नर ते  शिर्डी या मार्गावर खोपडी येथील शिवार परिसरात खळबळ उडाली असून येथे  विवस्त्र अवस्थेत अज्ञात  महिलेचा  मृतदेह आढळला आहे. मात्र हा मृतदेह रस्त्यावर पडल्याने त्याच्यावरून वाहने गेल्यामुळे  ओळख पटवता आली नाही. याठिकाणी माहिती मिळताच पोलिस आले होते त्यांनी तपासा सुरु केले आहे.प्राथमिक स्थितीत या महिलेसोबत घातपात झाला असावा, तर कोणीतरी तिच्यावर अत्याचार करत तिला रस्त्यावर फेकून दिले असावे असा अंदाज पोलिस लावत आहेत. पुरावा नष्ट करण्यासाठी विवस्त्र अवस्थेत मृतदेह चालत्या वाहनातून फेकला असावा असा सुद्धा अंदाज आहे.महिला ३५ ते ४० वर्षातील असावी असा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणातून मोठा घातपात असावा असा अंदाज पोलिस वर्तवत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.