Woman Burnt Lasalgaon Nashik लासलगाव महिलेला भर दिवसा पेट्रोल टाकून जाळले

लासलगाव येथे संतापजनक घटना घडली आहे. जसे हिंगणघाट येथे घडल तसा प्रकार भरदिवसा घडला. Woman Burnt Lasalgaon Nashik

पूर्ण वृत्त असे की, निफाड तालुक्यातील लासलगाव येथे बसस्थानकाच्या आवारात हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती घडली असून एका महिलेवर पेट्रोल फेकून काही अज्ञात हल्लेखोरांनी जाळण्याचा प्रयत्न केला आहे . घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

प्रकरण समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाला अटक केली आहे. आज दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला असून, घटनेत महिला ५० टक्के भाजली आहे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

या महिलेचे ज्या युवकासोबत अनैतिक संबंध होते,  त्या युवकाचा साखरपुडा मोडण्यासाठी त्या महिलेने प्रयत्न केल्याने त्याचा राग मनात धरून त्या युवकाने आज पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पीडित माहिला विधवा असल्याचे समजते. त्या युवकाचा साखरपुडा मोडण्याच्या कारणाने आलेल्या दोन युवकांनी या महिलेवर पेट्रोल टाकून तिला पेटवल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला.

त्यानंतर जखमी अवस्थेत त्या पीडित महिलेला लासलगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पुढील उपचारांसाठी तात्काळ पीडितेला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 

पीडित महिला तीस वर्षीय विधवा असून, तिला तीन अपत्य आहेत. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. 

हिंगणघाट (जि. वर्धा) येथील घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील महिलेला पेटवून देण्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा खळबळ माजली आहे. Woman Burnt Lasalgaon Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.