trainहात बांधून मायलेकाने घेतली रेल्वेखाली उडी,वाचा पुढे काय झाले

रविवारी (ता. 28) धक्कादायक घटना घडली. एस. टी. वाहक यांनी एकुलता एक मुलासह रेल्वेखाली आत्महत्या केली. मायलेकाच्या या धक्कादायक निर्णयाने परिसरात खळबळ उडाली. येवला एसटी आगारात वाहक असलेल्या महिलेने तिच्या तरुण मुलासह रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. train

रविवारी (ता. 28) मध्यरात्रीच्या सुमारास लासलगाव येथे धक्कादायक घटना घडली. लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावर कि.मी. 233 च्या पोल क्र. 22/23 च्या दरम्यान मध्यरात्री एकमेकांचे हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत रेल्वेखाली ऊडी मारुन मायलेकाने जीवनयात्रा संपवली. अंजली भुसनळे व उत्कर्ष भुसनळे (27) (रा.विठ्ठलनगर, निलंबरी कॉम्लेक्स, औरंगाबाद रोड) असे मृत मायलेक. अंजली ह्या 15/16 वर्षांपासून मयत पतीच्या जागेवर येवले येथे अनुकंपावर नोकरीला होत्या. तर मुलगा उत्कर्ष हा नाशिक येथे नोकरीला होता. लॉकडाऊननंतर घरुनच काम करत होता. 3/4 महिन्यांपुर्वीच लॉकडाऊनमध्ये त्याचा विवाह झाला होता. यावेळी कुटुंबाने पाळलेला पोपट ही सोबत होता. सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही. दिवस ऊजाडेपर्यंत तो त्यांच्या मृतदेहाजवळ आढळुन आला.
एसटी वाहक असलेल्या अंजली भुसनळे यांनी त्यांचा तरुण मुलगा उत्कर्ष भुसनळे याच्यासह लासलगाव येथे रेल्वेखाली मध्यरात्री आत्महत्य केल्याचे उघड झाले आहे. लासलगाव रेल्वे स्थानकाजवळच दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. अंजली या येवला बस आगारात वाहक म्हणून नोकरीला होत्या. त्यांचा मुलगा उत्कर्ष याचे लॉकडाऊन काळातच लग्न झाले आहे. त्याची पत्नी सध्या माहेरी गेलेली आहे. भुसनळे कुटुंबिय येवल्यात राहतात. त्यांनी २४ किलोमीटर लांब असलेल्या लासलगावला जाऊन रात्री २ वाजता रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समजते आहे. असे काय घडले की मायलेकाने टोकाचे पाऊल उचलले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. train
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.