शरीराच्या  स्वास्थ्या सोबतच मनाचे सुध्दा स्वास्थ्य आवश्यक आहे-राज्योगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी

प्रत्येक कर्माचे मूल हे आपले मन आहे. मन जसे विचार करेल त्याच प्रमाने आपण कर्म करीत असतो. यातूनच चांगल्या कर्माचे फळ हे चांगले तर वाईट कर्माचे फळ हे वाईट मिळते. हे सर्व आपल्या मनावरच अवलंबून असते. म्हणूनच आपल्या जीवनात श्रेष्टता, पवित्रता, शांती, सुख या सर्व अध्यात्मिक मुल्यांचा जर जीवनात अनुभव करायचा असेल तर शरीराच्या  स्वास्थ्या सोबतच मनाचे सुध्दा स्वास्थ्य आवश्यक आहे. मनाच्या स्वास्थ्यासाठी  ब्रह्मकुमारी संस्थे तर्फे शिकविण्यात येणारा राजयोगाचा अभ्यास करणे अतिशय आवशक आहे. असे प्रतिपादन राज्योगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांनी केले.
चिंचबन येथील चिन्मय आश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचीत्त्या साधून आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात दिदी बोलत होत्या.  या प्रसंगी योग विद्या धाम पंचवटी चे अध्यक्ष  अरुण  एकबोटे,    कार्याध्यक्ष  सुधीर सोमय्या,   चिन्मय आश्रमाच्या कु प्रेरणा दीदी,   ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी,  योग शिक्षिका  सौ  सुचेता गुजराथी,  योग प्रशिक्षक बालकृष्ण  आहेर, योग  प्रशिक्षकसंजय पवार  , योग प्रशिक्षक पंकज शहा,  इ. उपस्तीथ होते.
सकाळच्या सत्रात मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये ब्र्हमाकुमारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने योग दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी अधिकारी अहिराव सटप ब्रह्माकुमार मनोहर तांबे, ब्रह्माकुमार राजन राजधर, ब्रह्माकुमार साहेबराव आदि उपस्तीत होते.
ब्राहामाकुमारी संस्थेच्या नाशीक सेवाकेंद्र तर्फे दिंडोरी कॉलेज दिंडोरी येथे जागतिक योग दिन निम्मित्त राजयोगाचे महत्त्व या विषयावर  ब्रह्मकुमारी मुग्धा तांबे व ब्रह्माकुमारी जया कुलकर्णी यांचे प्रवचन ठेवण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य वैशाली रोकडे उपस्तीत होत्या.
व्ही. एन. नाईक महविद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक यांच्या अध्यक्षते खाली जागतिक योग दिनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचवटी सेवाकेंद्राच्या ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी उपस्तीत होत्या. योग शिक्षक अतुल कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी यांनी राज्योगाचे महत्व विषद करत सांगितले कि राज योग असा मनोकायिक योग आहे जो केल्याने परीक्षेचे दडपण व भीती नाहीशी होते. राजयोग केल्याने मन शांत होते आणि बौद्धिक क्षमता वाढून मेमरी पावर वाढते. कार्यक्रमात ब्रह्मकुमारी संस्थेचे बी.के. अशोक घाटे, बी.के. रुची अडतिया, बी.के. विमल माता आदि उपस्तीत होते.

नाशिकरोड  ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात पतंजली समितीचे डॉ. अमित यांच्या मार्गदर्शनात जागतिक योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोढ्या संखेने उपस्तीत होते. नाशीक रोड येथील  ब्रह्मकुमारी गोदावरी दिदी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तर  ब्रह्मकुमारी शक्ती दिदी यांच्या हस्ते योग शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
निफाड- येथिल मर्क्युरी हाल मध्ये  ब्रह्मकुमारी संस्थे तर्फे जागतिक योग दिना निमित त्रि दिवसीय  राजयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले.   यात ब्रह्माकुमार शिव प्रसाद यांनी   राजयोगाच्या माध्यमातून जीवन जगण्याची कला शिकवली. या शिबिराचा २०० झनांनी लाभ घेतला.


राणेनगर- सेवाकेंद्रा तर्फे राजीव नगर येथील दत्तमंदिर सभागृहात तिसऱ्या अंतरराष्ट्रीय योग दिना  निम्मित ५ दिवसीय संपूर्ण स्वास्थ्य व औक्युप्रेषर शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध ऑकुप्रेषर तज्ञ डॉ. सुधीर सोमय्या यांनी मार्गदर्शन केले. डॉ. राजेश जावळे , ब्रह्मकुमारी साधक अर्चना पाटील यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात राणेनगर सेवाकेंद्र प्रमुख ब्रह्मकुमारी विना दिदी यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला तर ब्रह्मकुमारी कावेरी यांनी सूत्र संचालन केले. ब्रह्मकुमारी चंदा  दिदी यांनी प्रसादाचे वाटप केले. या शिबिराचा २०० नागरिकांनी उत्स्पुर्त लाभ घेतला.
गंगापूर रोड सेवाकेंद्र तर्फे अंतरराष्ट्रीय योग दिनानिम्मित  खास माउंट आबु येथून वरिष्ठ राजयोग शिक्षक व ब्रह्मकुमारी संस्थेच्या मेडिकल विंगचे सहसचिव  डॉ. प्रेम बसंत यांचे जीवनात व्यायामाचे महत्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. गंगापूर रोड सेवाकेंद्राच्या ब्रह्मकुमारी मनीषा दिदी यांनी प्रमुख वक्ते डॉ. प्रेम बसंत यांचे पुष्पा गुच्चे देऊन स्वागत केले. या प्रसंगी गंगापूर रोड परिसरातील साधक व नागरिक उपस्तीत होते.


ब्रह्माकुमारी संस्थेच्या मेरी येथील  मुख्य सेवाकेंद्रात तिसऱ्या अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून दि.  २१ ते २४ जून पर्यंत  ध्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या साधकांनी  ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रथम संचालिका तपस्विनी राजयोगिनी  ब्रह्माकुमारी मातेश्वरी जगदंबा यांच्या स्मृतीला या ध्यान योग शिबिरातून आदरांजली वाहिली. या प्रसंगी मुख्य सेवाकेंद्र प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदी यांनी मातेश्वरी जगदंबा यांनी राजयोगाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव केला. या प्रसंगी माउंट आबू येथून आलेले वरिष्ठ राजयोग शिक्षक व ब्रह्मकुमारी संस्थेच्या मेडिकल विंगचे सहसचिव  डॉ. प्रेम बसंत यांनी या शिबिराला विशेष मार्गदर्शन करून शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या काही टिप्स प्रात्यक्षिका द्वारे दिल्या. साधकांनी वैश्विक कल्याणासाठी राजयोग केला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.