संसारातील वाद किती विकोपाला जातात त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. असाच प्रकार नाशिकमध्ये घडला असून, सुनेने केलेल्या मानसिक आणि आर्थिक छळामुळे सासुच मृत्यू झाला आहे. न्यायालयातील केस मागे घेण्यसाठी सुनेच्या घरातील व्यक्ती आणि वकिलाने ४० लाख रुपये खंडणी मागितली आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.wife tortures husband and mother in law demands 40 Lakhs Rupees
बजेट ज्वेलरी नक्की क्लिक करा !
सविस्तर वृत्त असे की , सून स्वाती प्रवीण गांगुर्डे तिचा भाऊ सागर पगारे, आई उषा पगारे, विशाखा पगारे (रा़आदर्शनगर, साक्री, धुळे), ठाणे टिटवाळा येथील वकील पंकज राजबली मनोहर (रा़ बद्री पॅलेस) यांच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणात सुनेच्या त्रासामुळेच सासूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप करून प्रवीण गांगुर्डे यांनी केला आहे. wife tortures husband and mother in law demands 40 Lakhs Rupees
पोकार कॉलनी दिंडोरी रोड येथील गणेश अपार्टमेंटमधील प्रवीण गांगुर्डे यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री येथील राणी उर्फ स्वाती भीमराव पगारे सोबत झाला. त्यांच्यात नेहमीच वाद होत होते त्यामुळे त्यांनी काही महिन्यांनी न्यायालयातून घटस्फोट घेतला़ आहे. मात्र सून राणीने पतीसह सासरच्यांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळाची फिर्याद दाखल केली होती. यामुळे पती प्रवीण गांगुर्डे याच्यासह त्याच्या भाऊ , आईवर गुन्हा दाखल केला. म्हसरूळ पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. मात्र अनेक महिन्यांपासून पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या वा-या कराव्या लागल्याने गांगुर्डे कुटुंबीय वैतागले आहेत. wife tortures husband and mother in law demands 40 Lakhs Rupees
म्हसरूळ पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यात गांगुर्डे कुटुंबाला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, मात्र राणी हिने त्रास देण्याच्या उद्देशाने संशयित गांगुर्डे यांना जामीन मंजूर झाल्याबाबत न्यायालयात पुन्हा विरोधात अपील दाखल केले. त्यामुळे गांगुर्डे कुटुंबीयांना पुन्हा न्यायालयात यावे लागले.
भारतीय कायदा माहीत करायचा, तुमचे अधिकार काय आहेत मग हे पुस्तक तुमच्या साठी आहे
सून राणी, तिची आई, भाऊ व वकिलाने पती प्रवीण गांगुर्डे व सासूकडे गुन्हा मागे घ्यायचा असेल तर चाळीस लाख रुपयांची मागणी केली़ होती, तसेच पैसे न दिल्यास तुम्हा सगळ्यांना तुरुगात बसवून ठेवते, सोबतच तुमच्या पूर्ण खानदानाची वाट लावते, असा दम दिला़ होता. या छळामुळे सासू लीलाबाई फार खचल्या आणि शुक्रवारी (दि. १४) रात्री हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचा मृत्यू झाला़ आहे.wife tortures husband and mother in law demands 40 Lakhs Rupees
कार मध्ये लावायचे होल्डर !
प्रवीण गांगुर्डे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, खंडणीसह शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. पोलिसांनी तपास सुरु केला असून कारवाई करत आहे.
<