sharp razor पत्नीच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार , पती फरार

पेठरोड परिसरातील गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तुळजाभवानी नगर समर्थनगर येथे पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे या घटनेत महिला पूजा दीपक पवार (23) ही गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.sharp razor

संशयित आरोपी पती दीपक पवार याने पत्नीवर वस्तऱ्याने वार केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत रात्री उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दीपक पवार हा पत्नी पूजा हिच्या समवेत महिन्याभरापूर्वी तुळजाभवानी नगर येथील ओम साई निवास येथे राहण्यासाठी आला होता. काहीतरी कौटुंबिक कारणावरून गुरुवारी सायंकाळी दोघा पती-पत्नीत वाद झाले. त्यातून संशयित आरोपी पती दिपकने पत्नी पूजा हिच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार केले. त्यानंतर पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद करून पळ काढला.

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या पूजा हिने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला . मात्र कोणी मदतीला न आल्याने तिने ओळखीच्या व्यक्तीला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने व घरमालकाने घराचा दरवाजा उघडला असता पूजा रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत तत्काळ जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले.

तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते दरम्यान घटनेचे वृत्त समजतात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार सुरेश नरवाडे संदीप शेळके व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलिस फरार संशयितांचा शोध घेत आहे.sharp razor

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.