पत्नी सासरच्या लोकांच्या जाचास कंटाळून पंचवटीत पतीची आत्महत्या

नाशिक : पंचवटी येथील युवकाने पत्नी, सासरच्या होत असलेल्या मानसिक, आर्थिक जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. श्रवण सनत जोशी (वय २९, रा़ जाधव भुवन, पंचवटी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून, पंचवटी पोलिसांनी गुजरात राज्यातील राजकोट येथील त्याच्या पत्नीसह सासरच्यांकडील सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.wife father law home person’s torchers husband suicide

या प्रकरणात चंदा सनत जोशी (जाधव भुवन, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा श्रवण याने ३ जुलै रोजी विषप्राशन करून आत्महत्त्या केली़ आहे. तर कालावधी ११ जून २०१८ ते २ जुलै २०१८ मध्ये सून मोहिनी हिने माहेरकडील नातेवाईक संशयित बिपीन बाबुलाल पंड्या, मनोज बाबुलाल पंड्या, संजय बाबुलाल पंड्या, बाबुलाल पंड्या, चंद्रिकाबेन विजय पंड्या, चेतनाबेन मनोज पंड्या (सर्व रा. राजकोट, गुजरात)  या सगळ्यांनी एकत्र येत श्रवणला मोबाइलवर फोन करून सतत शिवीगाळ  केली आहे. तर राजकोट येथील न्यायालयात मुलास वारंवार चकरा मारायला लावून ११ लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्याने न्यायालयात तक्रार करण्याची सतत धमकी दिली जात होती. याच दबावात श्रवण यांने  आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. पोलिसांनी फिर्याद नोंदवली असून पुढील कारवाई करत आहेत.wife father law home person’s torchers husband suicide

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.