मी टू मोहिमेची सुरुवात कोणी केली ? ही आहे ती हॉट अभिनेत्री (माहिती, फोटो फिचर)

मी टू मोहिमेची सुरुवात :

५ ऑक्टोबर २०१७ रोजी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात अॅशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाले. अॅशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.हार्वे वेनस्टेईन यांनी पल्प फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा ऑस्कर पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रात आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे याची त्याच्या द वेनस्टेइन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली. who started #Metoo hash tag on internet marathi information news nashik 

१२ ऑक्टोबर २०१७ रोजी इसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने अॅमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार अॅमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.  who started #Metoo hash tag on internet marathi information news nashik 

१६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग वापरला. या नंतर अनेक अभिनेत्री आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला. who started #Metoo hash tag on internet marathi information news nashik 

१८ ऑक्टोबर २०१७ ला ऑलिम्पिक जिमनॅस्टीक खेळाडू मॅकायला मरोनी हिने अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमचे डॉक्टर लॅरी नास्सर यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाला वाचा फोडली. जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ टीमचे डॉक्टर असंरे नास्सर सध्या बालकांच्या लैंगिक शोषणा संदर्भातील एका खटल्यात कारागृहात आहेत. who started #Metoo hash tag on internet marathi information news nashik 

२९ ऑक्टोबर २०१७ रोजी अॅन्थोनी रॅप याने केव्हिन स्पेसी या ऑस्कर पारितोषिकप्राप्त अभिनेत्या विरुद्ध शोषणाचे आरोप केले. या नन्तर अनेक स्त्री तसेच बाल कलाकारांनी असेच आरोप केले आणि स्पेसी विरुद्ध जनमत तयार झाले.

यानन्तर अनेक व्यवसायातील बड्या धेंडानी केलेल्या लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या स्त्री पुरुषांनी आवाज उठवला आणि अनेक प्रकरणात स्टुडीओ आणि कंपन्यांना अशा लोकांविरुद्ध कारवाई करावी लागली. who started #Metoo hash tag on internet marathi information news nashik 

मी टू ची निर्माती

ट्विटर संकेत स्थळावर जरी आलीस मिलानो हिने #मी टू चा वापर प्रचलित केला असला तरी हे शब्द लैंगिक शोषणासंदर्भात वापरण्याचे श्रेय तराना बर्क या स्त्री हक्क कार्यकर्तीला जाते. १९९७ साली एका तेरा वर्षाच्या लैंगिक शोषणाची शिकार बनलेल्या मुलीशी बोलत होत्या. “तिला कसा प्रतिसाद द्यावा हेच मला सुचत नव्हते. ‘मी सुद्धा ‘ अशा अत्याचाराची शिकार आहे हे सुद्धा मी तिला सांगू शकले नाही. अनेक वर्ष हा प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला.”

या संभाषणानंतर १० वर्षांनी तराना बर्क यांनी ‘जस्ट बी’ या ना-नफा संस्थेची स्थापना केली. लैंगिक अत्याचाराची आणि हिंसेची शिकार बनलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी हि संस्था काम करते. तराना यांनी या चळवळीला नाव दिले “मी टू”.

who started #Metoo hash tag on internet marathi information news nashik 

फोटो फिचर :

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.