मोबाइल फोनसाठी सर्वात चांगले प्रोसेसर कोणते आहे?

मोबाईल प्रोसेसर बनवणाऱ्या 5 कंपन्या आहेत:-

Apple, सॅमसंग, मेडियाटेक, किरीन आणि Snapdragon. Apple चे प्रोसेसर A11, A12 अश्याप्रकारच्या नावाने येतात. आयफोन 8 पासून पुढचे प्रोसेसर चांगले आहेत. A11, A12

Apple

सॅमसंग चे प्रोसेसर EXYNOS नावाने येतात. सॅमसंग M30 मध्ये EXYNOS 7904 प्रोसेसर असून हा मिडीयम पॉवर चा प्रोसेसर आहे. 9609, 9610, 9625 हे पॉवरफुल प्रोसेसर आहेत सॅमसंग S10 मध्ये 9820 प्रोसेसर वापरला आहे जो EXYNOS चा सगळ्यात पॉवरफुल आहे.

मेडियाटेक चे प्रोसेसर HELIO नावानेही येतात. HELIO X23, X25, p60, p70. यातील x series चे प्रोसेसर जुने झाले असून X23 पासून पुढील प्रोसेसर चांगले आहेत पण त्यांना पॉवर जास्त लागते त्यामुळे हिटिंग होऊन बॅटरी लवकर उतरते. P60, P70 हे नवीन प्रोसेसर आहेत. हे मिडीयम पॉवर चे आहेत. REALMI 3I, REALME ONE मध्ये P60 वापरलेला आहे REALME 3 मध्ये P70 आहे जो चांगला आहे. P90, P90T नवीन येणार आहेत ते जास्त पॉवरफुल आहेत.

किरीन चे 655 पासून पुढील चांगले समजावे. huawei, honor या मोबाईल मध्ये किरीन चे प्रोसेसर वापरले जातात.SNAPDRAGON चे 636 पासून 660 पर्यंतचे प्रोसेसर मिडीयम पॉवर चे आहेत. SNAPDRAGON 675, 710, 712 हे आणखी चांगले आहेत, SNAPDRAGON 835, 845, 855 हे FLAGSHIP मोबाईल मध्ये वापरतात हे खूप पॉवरफुल प्रोसेसर आहेत.

चांगले प्रोसेसर कसे ओळखावे:- प्रोसेसर वर कॉर्टेक्स A7, A15, A53, A72 हा आकडा दिलेला असतो. तुम्ही स्पेसिफिकेशन्स गुगलवर चेक करून पहा. हा जितका मोठा तितका प्रोसेसर पॉवरफुल मानावा. नुसत Ght जास्त असून काही होत नाही. A53 म्हणजे प्रोसेसरच्या आतील एक नक्षा असतो A53 पेक्षा A72 चा नक्षा जास्त जटिल आहे.

याचा अर्थ असा की, हा प्रोसेसर जास्तीत जास्त मोठे टास्क कमीत कमी वेळेत करू शकतो. पण त्यामुळे हा पॉवर पण जास्ती खाणार. म्हणून तुम्ही एखाद्या प्रोसेसरचे स्पेसिफिकेशन्स चेक केले तर असे दिसेल की पहिल्या चार कोर ह्या A53 च्या असतात आणि बाकीच्या चार कोर ह्या A72 किंवा A74 च्या असतात. किंवा काही वेळेस इथे क्रियो सिल्वर आणि गोल्ड असेही लिहिलेले दिसेल.

सिल्वर म्हणजे कमी पॉवर आणि गोल्ड म्हणजे जास्त पॉवर. जेव्हा आपण फोन लावतो, व्हिडिओ बघतो, गाणे ऐकतो, नेट वापरतो अश्यावेळी ह्या A53 च्या कोर काम करत असतात आणि A72 किंवा A74 च्या कोर ऑफ असतात. करण इथे जास्त ताकदीची गरज नसते. ह्यामुळे हिटिंग कमी होऊन बॅटरी पॉवर ची बचत होते. ज्यावेळी आपण मल्टी टास्क करतो किंवा गेम खेळतो अश्यावेळी लगेचच A72 च्या मोठ्या कोर ऑन होतात. करण इथे प्रोसेसरला जास्त ताकदीची गरज असते.

याच बरोबर 14nm, 10nm, 7nm असे लिहिलेले तुम्हाला दिसेल. हा आकडा जितका छोटा तितका प्रोसेसर चांगला आणि लेटेस्ट मानावा. 14nm, 10nm हे प्रोसेसरच्या आतील जे ट्रांसिस्टर असतात त्यांमधील अंतर असते. हे अंतर जितके कमी तितका प्रोसेसर कमीत कमी पॉवर मध्ये काम करू शकणार. हा आकडा जितका कमी असेल तितकी हिटिंग कमी होईल आणि बॅटरी बॅकअप जास्त मिळेल. आजकाल कमीत कमी 14nm चा प्रोसेससर पाहिजे. यापेक्षा जास्त nm चा असेल तर तो जुना मानावा आणि यापेक्षा कमी nm चा असेल तर तो लेटेस्ट मानावा.

Snapdragon 625, 636, 660 हे 14nm वर आहेत, मेडियाटेक हेलिओ p60, p70 12nm वर आहेत, snapdragon 710, 712 10nm वर आहेत तर 855 8nm वर आहे. Apple xs मोबाईलचा A12 प्रोसेसर 7nm वर आहे. म्हणजेच apple सगळ्यांच्या पुढे आह

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.