पैगंबरांबाबत मान्यवरांचे विचार – पैगंबर जन्मदिनाच्या समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !

पैगंबर मुहंमद (स.अ.स.) यांच्या जन्मदिनाच्या समस्त भारतीयांना हार्दिकशुभेच्छा!
पैगंबरांबाबत मान्यवरांचे विचार –

महात्मा जोतीबा फुले –

“मुहंमद झाला जहांमर्द खरा | त्यागीले संसारा |
सत्यासाठी ||
जगाचा पालक निर्मिक अनादी | सर्वकाळ वंदी |
निके सत्य ||
मूर्ती पुजकांच्या बंडाशी मोडीले || ढोंगी वळवीले || ईशाकडे ||
आर्यधर्म-भंड इस्लामें फोडीले || ताटात घेतले||
भेद नाही ||….
कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास ||
जात प्रमादास || खोटी बुडी ||
मोडीला अधर्म आणि भेद || सर्वांत अभेद ||
ठाम केला ||

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज –

“मुहंमदाने केली प्रार्थना |
विखुरला इस्लाम कराया शहाणा ||
संघटीत केले तयाने स्वजना| तया काळी ||
लोक प्रतिमापूजक नसावे ||
त्यानी एका ईश्वरासी प्रार्थावे ||
हा मुहंमदांचा ऊपदेश || नव्हे एकाच देशासाठी||

महात्मा गांधी –

“ईस्लामने विश्वक्षेत्रात विजय मिळविला तर ही शक्ती ईस्लामच्या प्रेषितांचे अत्यंत साधे जीवन, निःस्वार्थपणा, वचनपालन, निर्भयपणा, त्यांचे आपले मित्र व अनुयायीयांवर प्रेम व ईश्वरावर विश्वास होता. ही शक्ती तलवारी ची नव्हती, तर ही सर्व वैशिष्ट्ये, गुण व समता होती, ज्याच्यामुळे सर्व अडथळे अडचणीवर ईस्लाममे विजय मिळविला.”

साने गुरूजी –

“पैगंबराने मिरासदारीची भिंताडे साफ पाडली. विशिष्ट हक्क व दर्जा त्यांनी साफ तोडला. स्वार्थी लोकांनी ईश्वराकडे जायच्या रस्त्यावर जी जाळी विणून ठेवली होती, ती पैगंबराने आपल्या जोरदार फुंकीने नष्ट केली. सर्व बंधने व मक्तेदारी मोडून ईश्वराला जनतेसाठी मुक्त केले…..तुम्ही परमेश्वारजवळ निर्धास्त जा, तो प्रेम करणारा, दयावान आहे, तेथे सारे समान! तेथे कोणाला जादा अधिकार नाही….
त्यांनी शिक्षणाची फार महती गायीली. ध्नान-विध्नानाची महती गायीली. लेखनीने मानवाचा निवाडा केला जातो. न्याय दिला जातो. मानवी कृत्याची छाननी करणारे, ईश्वराच्या दृष्टीने छाननी करणारे साधन म्हणजे लेखणी. लेखणी म्हणजे ध्नान! ध्नानाशिवाय सारे फोल! शिका, वाचा, पहा! पैगंबरांचा हा अमुल्य संदेश होता.”

आचार्य विनोबा भावे –

” पैगंबरांनी जगाला सुंदर संदेश दिला तो असा – परमेश्वर एक आहे. कोणताही मनुष्य कितीही मोठा असला तरी परमेश्वराची त्याची कदापी बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या व्यवहारात कसलाही भेदाभेद नको. सर्वांचे नाते बरोबरीचे आहे….म्हणून कुरआन ने म्हटले – जे लोक अल्लाह ला मानतात, दया दाखवितात, एकमेकांना सत्य मार्गावर चालण्यास मदत करतात, एकमेकांना धीर राखण्यास मदत करतात, न्यायासाठी झटतात व जुलमाचा प्रतिकार करतात, फक्त ते लोक सुरक्षीत आहेत. यात सर्व धर्माचे सार येऊन जाते – सत्य, प्रेम आणि करूणा!”

स्वामी विवेकानंद –

” पैगंबर मुहंमद (स.अ.) हे भ्रातृभावाच्या अग्निमंत्राचे दीक्षागुरू होते. पैगंबर समतेचे आचार्य होते.”

प्रबोधनकार ठाकरे –

” हा न भूतो न भविष्यती असा (समतेचा) चमत्कार कोणाच्या अंत:करणात कौतुकाच्या उर्मी उठविणार नाही ? इस्लाम धर्माच्या या तीव्रतम प्रसाराच्या मुळाशी मुहंमद (स.अ.) ने आत्मचिंतनातून निर्माण केलेल्या “एको देव” या मुख्य तत्वांची प्रेरणा होती.”

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.