काळजी घ्या : जोरदार गारपीटीची शक्यता,काढणीला आलेली पिकं योग्य ठिकाणी सुरक्षीत ठेवावी

उत्तर महाराष्ट्र सह नाशिकमध्ये  गारपिटीची पुन्हा शक्यता 23 फेब्रुवारीला उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम विदर्भात 24 फेब्रुवारीला गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे विदर्भातल्या गहू आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिकं योग्य ठिकाणी सुरक्षीत ठेवावी असे आवाहनच हवामान खात्याने केले आहे.

शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, पिकं उघड्यावर सोडू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात गारपिटीने थैमान घातल आहे.
मागीलआठवड्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला होता.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.