सिंधी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध – छगन भुजबळ

ज्येष्ट विधिज्ञ अॅड.अहुजा यांचे  वाढदिवसानिमित्त  अभिष्टचिंतन

नाशिक मध्ये वास्तव्यास असलेल्या संपूर्ण सिंधी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहू असे आश्वासन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक शहरातील ज्येष्ट विधिज्ञ अॅड.जमनादास अहुजा यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांनी त्यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन केले व निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. भुजबळ यांनी यावेळी अहुजा कुटुंबियांशी मनमोक्त संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अॅड.जयंत जायभावे, अॅड. नितीन ठाकरे, अॅड. सय्यद, अॅड. बाळासाहेब आडके, नानासाहेब महाले, रतन चावला, नानक मदनानी, किशन अडवाणी, शंकर जयसिंघानी, मोहन करीना, अर्जुन कटपाल, राजू पंजाबी, शाम पंजवानी, सतीश मोटवानी, कोमल अहुजा, ज्योती अहुजा, अॅड.चिन्मय गाढे, नाशिक शहर व परिसरातील सिंधी समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही नेहमीच आग्रही राहिलो आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात आम्ही नाशिकमध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामे आणून नाशिकचा विकास केला. मात्र त्यानंतर गेल्या पाच वर्षात आम्ही केलेल्या विकासानंतर सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून एक फुट देखील काम पुढे गेले नाही. त्यामुळे येथे बेरोजगारीसह अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नाशिकला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी सिंधी समाज बांधवांनी समीर भुजबळ यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी रतन चावला म्हणाले की, १९४७ देशात फाळणी झाली त्यावेळेस सिंधी समाज बांधव हे भारतात आले त्यावेळेस कॉंग्रेस सरकारने त्यांना मदत करून त्यांचे पुनवर्सन केले. त्यांना पुन्हा एकदा उभारी दिली. त्यामुळे कॉंग्रेस सरकारचे आम्ही ऋणी आहोत त्यामुळे संपूर्ण सिंधी समाज हा आघाडीच्या पाठीशी राहील. गेल्या पाच वर्षात नाशिकचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनता पुन्हा ही चूक करणार नसून आम्ही समीर भुजबळ यांच्या पाठीशी राहू असे त्यांनी यावेळी सांगितले. किशन अडवाणी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत संपूर्ण सिंधी समाज समीर भुजबळ यांच्या पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.