देशात ०१ जुलै पासून जी एस टी लागु करण्यात आला त्याची व्याप्ती फार मोठी आहे. त्याची यशस्वी पध्दतीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लोकांनी जर दैनंदीन व्यवहार करतांना दुकानदारांकडून खरेदीचे पक्के बिल घेतले व त्यावर जीएसटी कापलेला आहे का नाही ? त्याचा दर किती लावलेला आहे या कडे लक्ष दिले तर व्यापारी व उद्योजकांच्या करचुकवेगिरीला आळा बसू शकेल म्हणून प्रत्येक वस्तू किंवा सेवा खरेदी करतांना त्याचे बिल घ्यावे असे मत जी एस टी आयुक्त सौ चित्रा कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले आहे.
के टी एच एम कॉलेजच्या वाणिज्य मंडळाच्या उदघाट्न प्रसंगी नाशिक येथील जी एस टी आयुक्त सौ चित्रा कुलकर्णी उपस्थित होत्या . यावेळी त्या म्हणाल्या की ‘व्यापारी वर्गाने नवीन आणलेल्या GST कायद्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे व ह्या कायद्याबाबत भीती न बाळगता त्याचा अभ्यास करावा .
सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो परंतु थोड्याच दिवसात त्याची अंमलबजावणी सुलभपणे ते करू शकतील व त्याचा परीणाम देशाच्या विकासाला गती मिळण्यास मदत होईल याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ व्ही बी गायकवाड होते.
प्रमुख पाहुण्यांचा परीचय व प्रस्तावना वाणिज्य प्रयोगशाळा प्रमुख डॉ श्रीकांत जाधव यांनी केली तर आभार प्रा डी आर पताडे यांनी मानले, याप्रसंगी CMA प्रज्ञा चांदोरकर , CMA प्रशांत येवले , सीए उल्हास बोरसे , सीए उज्ज्वल नवसारीकर यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन प्रा डी जी पोटे यांनी केले.
नाशिक मधील घडत असलेल्या घटना, महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम, आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टींची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.
प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.
आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.
www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page
E-mail id :- nashikonweb.news@gmail.com
Twitter :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)
Facebook :- https://www.facebook.com/NashikOnWeb/