नाशिक रोडची अतिक्रमणे काढणार आयुक्त मुंढे यांचा इशारा

नाशिक : नाशिक रोड परिसरात रस्ते आणि इतर ठिकाणी असलेले अतिक्रमण काढले जाणार असून, नागरिकांच्या तक्रारींचे येत्या आठ दिवसात निकरण करण्यात येणार आहे. असे स्पष्ट शब्दात मुंढे यांनी सागितले आहे. वॉक विथ कमिशनर उपक्रमा अंतर्गत त्यांचा दौरा नाशिक रोड येथे होता.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने”वॉकविथ कमिशनर या उपक्रमा अंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आनंद नगर,मनपा शाळा क्र.१२५ मागील खेळाचे मैदान,नाशिकरोड येथे नागरिकांशी संवाद साधला. या ठिकाणी मांडलेल्या काही तक्रारींचे त्वरित निराकरण केले तसेच संबंधित खातेप्र मुखांना ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे सुचित केले या ठिकाणी एकूण १३० टोकन द्वारे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

२६ मे २०१८ च्या कार्यक्रमात एकूण १३० टोकन वाटप करण्यात आले, त्या टोकनद्वारेतक्रारी महापालिकेकडे नोंदवल्या गेल्या .त्यातगा यखे कॉलनीतील उद्यानाची दुरावस्था आहे,मोकळ्या जागेत जिम करावी, ऑनलाइन तक्रारीबाबत त्वरीत दखल घेतली, अनधिकृत रस्त्यावरभाजी विक्रेते बसले त्यांच्या अतिक्रमणकाढावे,बिटको हॉस्पिटलमध्ये औषध साठानाही,परिसरातील रस्त्यांवर कॅमेरे बसवावेत, झेब्रापट्टे मारावेत,गावठाणातील अतिक्रमण काढावे,व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून घ्यावे, मयूरकॉलनीत ड्रेनेज चोकअप आहे, अशा विविधप्रकारच्या तक्रारी टोकन द्वारे तसेच नागरिकांनीसमक्ष भेटून मा.आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडेनागरिकांनी मांडल्या त्याबाबत मा. आयुक्ततुकाराम मुंढे यांनी समर्पक उत्तरे देऊननागरिकांचे समाधान केले. तसेच या तक्रारीतातडीने सोडविण्याचा आदेश संबंधितखातेप्रमुखांना दिले.

या कार्यक्रमात बोलताना आयुक्ततुकाराम मुंढे यांनी सांगितले की वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमात छोट्या मोठ्या तक्रारी आलेल्या आहेत. छोट्या तक्रारी तातडीने सुटतील अतिक्रमणा बाबत असणाऱया तक्रारीबाबत लवकरच प्रश्न मार्गी लागेल नियमानुसार सर्वांनी बांधकाम करून घ्यावे जेणेकरून अतिक्रमण वाढणार नाही.नियमानुसार सर्वांनी काम करावे, रस्त्यावर कचराटाकू नये शहर स्वच्छ राहिले तर आरोग्यहीचांगले राहील रस्त्यावर पार्किंग करू नकारस्त्याचा वापर रस्त्यासाठीच राहु द्या,सर्वांनीकचरा विलगीकरण करावे, प्लॅस्टिकचा वापरटाळावा, अतिक्रमण करू नका. ज्या ठिकाणी हॉकर्स झोन आहे, त्या ठिकाणी व्यावसायिकांनाव्यवसाय करता येईल.

नागरिकांनी या गोष्टी पाळल्यास नाशिक स्मार्ट होण्यास हात भारलागेलं असे स्पष्ट केले.  यावेळी  मा. आयुक्ततुकाराम मुंढे यांनी केले. नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्या तक्रारी NMC E-CONNECT (एन.एम.सी. ई कनेक्ट) या अॅप वर टाकाव्यात अथवा मनपा मुख्यालय राजीव गांधीभवन येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीदु पारी ४ ते ५ या वेळेत दररोज नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी स्वतंत्र वेळ दिलेली आहे.या उपक्रमा अंतर्गत नागरिकांनी फीडबॅक फॉर्म भरून देण्याचे आवाहन यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.