आंतरराष्ट्रीय मानांकित अंध बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर गोव्याच्या संजय कवळेकरांचा प्रकाश

नाशिक येथील कालिका देवी सभागृहात ६ सप्टेंबर पासून सुरु असलेल्या मानांकित बुद्धिबळ स्पर्धेत गोवाचे संजय कवळेकर यांनी नऊ पैकी आठ गुण संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला तर महाराष्ट्रचे अमित देशपांडे यांना उपविजेतेपद मिळाले. vision barred special players chess championship Nashik Sports Sanjay Kawalekar

ऐतिहासिक दृष्ट्या घेण्यात आलेल्या या दृष्टीबाधित खेळाडूंच्या पश्चिम विभागीय निवड स्पर्धेत सहा राज्यातील शंभरावर खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सर्व सहभागी स्पर्धकांमधून प्रथम २५ खेळाडू व ५ महिला खेळाडू यांची गुजरात येथे १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजित होणाऱ्या ‘राष्ट्रीय ब’ स्पर्धेसाठी निवड झाली.

समारोप समारंभ भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते व मदत आणि पुनर्वसन महामंडळ, महाराष्ट्र शासन अध्यक्ष माधवजी भंडारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, कालिकादेवी संस्थानाचे अध्यक्ष अण्णा पाटील, रोटरीचे पदाधिकारी, अखिल अंध बुद्धिबळ महासंघाचे पदाधिकारी मनीष थूल व स्वप्नील शाह, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे डी. पी.जाधव सर, सचिन घोडेराव व जगदीप कवळ, जिल्हा संघटनेचे धनंजय बेळे, विनय बेळे, सुनील शर्मा आदी उपस्थित होते. vision barred special players chess championship Nashik Sports Sanjay Kawalekar

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्रांडमास्टर, अर्जुन पुरस्कार विजेते प्रविण ठिपसे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत खेळाडूंना प्रोत्साहित केले तर माधवजी भंडारी यांनी अंध खेळाडूंचा आवाज केंद्र शासनाकडे पोहचविण्याचे आश्वासन दिले. सदर स्पर्धा आखिल बुद्धिबळ अंध महासंघ यांच्या अधिकृत मान्यतेने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना व राष्ट्रीय दृष्टिहीन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.

तब्बल २५००० रकमेची रोख पारितोषिके सर्व पाहुण्यांच्या हस्ते लागोलग वितरीत करण्यात आली. रोटरी नाशिकतर्फे प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १५००, १००० व ५०० अशा रकमेची रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व स्पर्धकांना अधिकृत प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.

स्पर्धेचे धनाजी काकडे व प्रविण पानतावणे यांनी प्रमुख पंचांची निभावली. स्पर्धा यशस्वीतेसाठी विनायक वाडीले, भूषण पवार, अजित कुलकर्णी, सचिन निरंतर यांनी प्रयत्न केले.

‘राष्ट्रीय ब’ अंध बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे : १. संजय कवळेकर- गोवा २. अमित देशपांडे- महाराष्ट्र ३. सुजित चुडासमा- गुजरात ४. सचिन वाघमारे- महाराष्ट्र ५. सय्यम शाह – गुजरात ६. सूर्यप्रताप सिंघ- मध्यप्रदेश ७. विरल त्रिवेदी- गुजरात ८. अशोक बारोट – गुजरात ९. अमोल सकपाळ- महाराष्ट्र १०. . विकास शितोळे – महाराष्ट्र ११. वेगड मनुभाई –गुजरात १२. वैशाली सालावकर- महाराष्ट्र १३. चिरंतन मेसारिया- गुजरात १४. अनिरुद्ध खुंटे –महाराष्ट्र १५. दिनेश चंद- राजस्थान १६. दत्तात्रय वाडेकर- महाराष्ट्र १७. कार्तिक दामले- महाराष्ट्र १८. सुनील ससाणे- महाराष्ट्र १९. रोषण दिवारे- महाराष्ट्र २०. सतीश वाहुळे- महाराष्ट्र २१. आशिष रोकडे- महाराष्ट्र २२. लाव पटेल- गुजरात २३. तीजन गवर- महाराष्ट्र २४. प्रिन्स अकेदिवाला- गुजरात २५. प्रग्नेश सोलंकी- गुजरात २६. शोभा लोखंडे- महाराष्ट्र २७. हिमांशी राठी- गुजरात २८. रितू टेंभूर्णीकर – महाराष्ट्र २९. मृणाली पांडे- महाराष्ट्र ३०. शिवानी मेश्रीया- गुजरात

vision barred special players chess championship Nashik Sports Sanjay Kawalekar
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.