आदिवासी विकास योजनांमध्ये घोटाळा विजयकुमार गावित अडचणीत

राज्यात आदिवासी मंत्री असतांना २००४ ते ०९ या काळात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यावेळी मंत्री विजय कुमार गावित यांच्यावर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एम. जी. गायकवाड समितीच्या अहवालात समोर आले आहे. त्यामुळे गावित यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गावित यांनी लोकसभा २०१४ च्या निवडणुका होत्या तेव्हा भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

यामध्ये नाशिकचे बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी व अ‍ॅड. रत्नेश दुबे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. तर ६०० कोटी रुपयांच्या घोटाळा झाला असून चौकशी करावी अशी मागणी झाली केली. त्यावर कोर्टाने दखल घेतली होती यावर राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

गावित यांनी दिलेल्या आदेशामुळे सरकारला ३ कोटी ९० लाख ८६ हजार ३७६ रुपयांचा फटका आदिवासी विभागाला बसला आहे. प्रादेशिक व्यवस्थापक अधिकाऱ्यांनी एकूण १४ कोटी ८९ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा अपहार केला, असा निष्कर्ष समितीने काढला आहे. तर दुसरीकडे गॅस बर्नर खरेदीमध्येही घोटाळा झाल्याचे समितीने नमूद केले आहे. .त्यावेळी गावितांच्या आदेशानुसार १ लाख २३ हजार ९९८ गॅस बर्नर खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहेत . महामंडळाच्या घाईमुळे २५,५२७ गॅस बर्नरचे वापटच झाले नाही. त्यामुळे हे बर्नर गंजले आणि निकामी झाले. त्यामुळे इतके मोठे नुकसान झाले असे तपासात समोर आले आहे. तर अनेक ठिकाणी नोंदी नसून अनेक अधिकारी यामध्ये सामील होते तर कॅश बुकमध्येही नोंद केली नाही. प्रत्येक वेळी एकच ठेकेदार आणि त्यालाच ठेके दिले गेले असे उघड झाले आहे.

अधिकाऱ्यांनी एकूण ७२ कोटी ७४ लाख ७४ हजार ८९१ कोटी रुपयांचा अपहार केला आहे, असा निष्कर्ष समितीने काढला आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते आणि कोर्ट यावर काय कारवाई सांगते हे पुढे कळणार आहेच मात्र सत्तेत जरी असले तरी गावित अडचणीत सापडणार आहेत हे उघड होत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.