विजय बनछोडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश ‘क्रीडा सहप्रमुख’ पदी निवड

विजय बनछोडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश ‘क्रीडा सहप्रमुख’ पदी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी नुकतीच केली. या नियुक्तीबाबतचे पत्र भारतीय जनता पार्टीचे कार्यालयीन मंत्री मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते मंगळवार १७ एप्रिल रोजी मुंबई येथील कार्यालयात देण्यात आले. vijay banchode krida sahapramukh bhartiy janata yuva morcha maharashtra pradesh

विजय बनछोडे हे नाशिक महानगर भारतीय जनता क्रीडा युवा मोर्चाच्या क्रीडा समन्वयक पदी कार्य करत असून विविध खेळांच्या संघटनांवरही ते कार्य करीत आहे. त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू निर्माण केले असून अनेक गरजवंत खेळाडूंना युवा मोर्चाच्या माध्यमातून क्रीडा साहित्याचे वाटप त्यांनी केले आहे. खेळाडूंना ते पोलीस भारती प्रशिक्षण अनेक वर्षापासून मोफत देत असून त्यातून पोलीस दलात अनेक जण कार्यरत झाले आहे.

vijay banchode krida sahapramukh bhartiy janata yuva morcha maharashtra pradesh, विजय बनछोडे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश क्रीडा सहप्रमुख पदी निवड, bjp bhartiya janata party nashik news online updates live portal dharma kshetra kho kho coach nashik mahanagar नाशिक महानगर राष्ट्रीय खेळाडू खेळ

विजय बनछोडे स्वतः खो-खो चे उत्कृष्ट खेळाडू असून त्यांनी आपल्या प्रशिक्षण कालावधीत राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू त्यांनी घडविले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण व आदिवासी भागात त्यांचे कार्य मोलाचे ठरले आहे. क्रीडा प्रबोधिनी नाशिक, शिवशाही प्रतिष्ठान नाशिक, क्रीडा भारती नाशिक या संस्थांमार्फत क्रीडा व सामाजिक क्षेत्रात ते कार्य करत आहे. vijay banchode krida sahapramukh bhartiy janata yuva morcha maharashtra pradesh

त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहराचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार सौ. देवयानी फरांदे, आमदार सौ. सीमाताई हिरे, नाशिक विभागीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह संजय कुलकर्णी, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अजिंक्य सहाणे, अमित घुगे, शिवा जाधव, शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते गणेश चंद्रकांत मोरे, अखिल भारतीय तलवारबाजी संघटनेचे खजिनदार छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, क्रीडा भारती नाशिकचे कार्यवाह संजय पाटील, प्रद्युम्न जोशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, मराठा विद्याप्रसारक समाजाच्या संस्थेचे क्रीडा प्रमुख हेमंत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, तसेच क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

vijay banchode krida sahapramukh bhartiy janata yuva morcha maharashtra pradesh

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.