Video : आमदार फरांदे कोरोना पॉझिटिव्ह; दुपारीच मराठा समन्वय समितीच्या बैठकीला होत्या उपस्थित

MLA Pharande Corona Positive

नाशिक मध्यच्या भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचा करोना चाचणी अहवाल रविवारी (दि.१३) पाॅझिटिव्ह आला a आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मुंबईतील दोन दिवसीय अधिवेशन संपवून प्रा. फरांदे त्यांचा जळगाव दौरा आटोपून नाशिकला परतल्या होत्या. तेथून आल्यावर सावधगिरी म्हणून त्यांनी करोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. मध्यला काळात त्या अनेकांच्या संपर्कात आल्या. ते बघता संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून करोना चाचणी करुन घ्यावी अशी विनंती त्यांनी ट्विट करत केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आजच (दि. 13) दुपारी त्या मराठा समन्वय समितीच्या बैठकीत उपस्थित होत्या. त्याठिकाणी प्रचंड गोंधळ गराड्यात त्यांच्या हातातून माईक हिसकवत त्यांचे भाषण थांबविण्यात आले. यावेळी कोणतेही सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळण्यात आले नाहीत. तर आमदार प्रा. फरांदेही विना मास्क याठिकाणी होत्या.

स्वतःची खबरदारी म्हणून आत्तापर्यंत चार पाच चाचण्या करणाऱ्या प्रा. फरांदे यांनी कालही स्वॅब चाचणीसाठी दिला होता. त्या चाचणीचा अहवाल येईपर्यंत फरांदे यांनी कोणत्याही कार्यक्रमास जाणे उचित नव्हते. तरीही त्या विना मास्क बैठकीला उपस्थित होत्या. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आता धास्ती भरली आहे. MLA Pharande Corona Positive

त्या बैठकीचा हा तो व्हिडीओ :

Maratha Reservation Nashik Pharande गोंधळ : आक्षेप घेत आ. फरांदेंचे भाषण पाडले बंद

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.