Vehicles Ban Roads Nashik शहरातील रस्त्यांवर खाजगी वाहतुकीस बंदी : पोलीस आयुक्तांचा आदेश

अत्यावश्यक सेवार्थ वाहनांना लागणार विशेष परवाना

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार भारतात व महाराष्ट्रात वेगाने होत आहे. तसेच नाशिक शहरात सुध्दा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रस्त्यांवर कलम 144 अनुसार संचारबंदी/जमावबंदी लागू असूनही मोठ्याप्रमाणात नाशिककर रस्त्यांवर खाजगी वाहनाने प्रवास करताना दिसत आहेत. त्याच अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात खाजगी वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नाशिक शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन निर्गमित करण्यात आले आहेत. Vehicles Ban Roads Nashik

आज (दि. 23) सायंकाळी 7 वाजेपासून 31 मार्च पर्यंत फोजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम – १४४ अन्वये कोणत्याही व्यक्तीला नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी वाहने चालवीता येणार नाहीत.

यामध्ये सायकल तसेच पारंपारिक व अपारंपारिक इंधनावर चालणान्या मोटार सायकल (गिअरसह/शिवाय), सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने, जड वाहतुकीची वाहने यांचा प्रवास व वाहतूक यासाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता मानवी जिवीताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होऊ शकते. त्या अनुषंगाने तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यासाठी स्थानिक निवासी, अभ्यागत, वारंवार कामानिमित्त नाशिक शहरात प्रवेश करणाऱ्यांसाठी हा उपाय करण्यात आला आहे.

या आदेशाने खाजगी प्रवासी वाहने तसेच सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, अॅप आधारीत ओला, उबेर व तत्सम वाहने या सर्वांना रूग्णांच्या वाहतुकी व्यतिरिक्त वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.

मात्र अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. ओला, उबेर आणि अन्य प्रकारे रिक्षा, किंवा प्रवासी वाहनांचा वापर आत्यंतीक तातडीचे प्रसंगी, रुग्णांची तपासणी करणे अथवा दवाखाना / इस्पितळात दाखल करण्यासाठी (वाहन चालक व ०२ व्यक्ती) यांना या आदेशान्वये परवानगी देण्यात आली आहे.

सदर आदेश खालील बाबतीत लागू होणार नाहीत :

• पोलीस व आरोग्य विभाग तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबंधीत (फक्त कर्तव्यार्थ)

• तातडीचे रूग्ण वाहतूक व हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ (फक्त कर्तव्यार्थ)

• अत्यावश्यक सेवा (उदा. वीज, पाणीपुरवठा, दुरसंचार, अग्निशमन, बँक व एटीएम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या पायाभूत विकासाशी संबंधीत उद्योग – CNI) (फक्त कर्तव्यार्थ व तातडीचे असल्यास)

• जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतूक

• प्रसारमाध्यम व त्यांचे प्रतिनिधी (फक्त कर्तव्यार्थ)

• पोलीस आयुक्तांच्या वतीने व जिल्हाधिकारी, नाशिक यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती (टिप – वर नमूद प्रमाणे सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी त्यासाठी त्यांचे ओळखपत्र व सदर विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असेल.) Vehicles Ban Roads Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.