वणी पुतणीअत्याचार खून प्रकरण : आई,बाप,भाऊ यांची नराधम पुत्रास मदत

नात्याला काळीमा फासणारी घटना वणी येथे घडली आहे. यामध्ये काकाने आपल्या 7 वर्षीय पुतणीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला आहे. मात्र हा नराधम एकच गुन्हेगार नाही तर नराधम त्याचा बाप,आई आणि त्याचा भाऊ यातिघांनी हा सर्व प्रकार केल्याचे उघड झाले आहे.तर या प्रकरणी पोलिसांनी याचौघांना  कोर्टात हजर केले असता कोर्टाने यांना ३ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एका आठवर्षीय बालिकेला घरच्यांनी तंबाखूची पुडी आणण्यासाठी दुकानात पाठविले होते. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने दुकानात जाऊन चौकशी केली असता तिला जाऊन बराच वेळ झाल्याचे दुकानदाराने सांगितले. त्याचवेळी संशयित विलास अण्णासाहेब महाले (३०) हादेखील दुकानात उपस्थित होता.

‘मीसुद्धा तिला तंबाखूची पुडी आणायला  सांगितले होते’, असे मयत बालिकेच्या आईला सांगून तेथून तो पसार झाला होता . नातेवाइकांनी शोधाशोध करूनही बालिकेचापत्ता न लागल्याने संशयिताच्या घरास कुलूप बघून नातेवाइकांचा संशय निर्माण झाला होता  त्यांनी घराचे कुलूप तोडून बघितले असता सदर बालिका मृत अवस्थेत  आढळून आला.

मात्र हे सर्व घटना घडत असताना      नराधम मुख्य     आरोपी   विलास अण्णासाहेब महाले याला  हे  प्रकरण बाहेर येवू नये म्हणून त्याचा बाप अण्णासाहेब    महाले, त्याची आई शैलाबाई  महाले आणि  त्याचा भाऊ प्रवीण अण्णासाहेब महाले  या सर्वांनी     एकत्र  येवून  त्या   निरागस बालिकेचा खून केला तींचा मृतदेह   लपवण्यासाठी  तिच्या अंगावर माती टाकली आणि     घरातील असलेल्या  टोपली खाली झाकून ठेवला होता. तर मुख्य आरोपीला गुजराथ कडे पळून जाण्यासठी सुद्धा मदत केली होती. त्यामुळे पूर्ण नात्यांना यासर्वांनी   काळिमा फासला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.