फोटोचे सत्य : या पोलिस अधिकाऱ्याने का ? जोडले हात

सध्या फेसबुक इतर ठिकाणी एक पोलिस अधिकारी हात जोडलेला दिसून येत असून हा फोटो खूप व्ह्यायरल झाला आहे. तुम्हालाही याची माहिती हवी असेल ना.. यामध्ये हा फोटो आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यात आहे. मोटारसायकलवर आपल्या कुटूंबातील 4 सदस्यांना घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी  हाथ जोडले आहे. यामध्ये जे अधिकारी मदकासीरा सर्कल चे इन्स्पेक्टर बी. शुभकुमार साहे. हे पोलिस अधिकारी  कामासाठी निघाले होते. यावेळी रस्त्यावर त्यांना  हनुमंता रायडू नावाची  व्यक्ती आपल्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीवर आपल्या 2 मुलांसह मागे आपल्या पत्नी, साली  घेऊन जाताना दिसले आहेत. ही सर्कस पाहून अधिकारी यांना फार मोठा धक्का बसला याला काय शिक्षा करावी असे विचारले असता याला शिक्षा नको असे करत त्यांनी सर्वांसमोर हात जोडले आणि म्हणाले ही यांची चूक नाही आम्हा पोलिसांची चूक आहे की आम्ही लोकांचे प्रबोधन करत आहोत. तुम्ही महान आहात असे उपरोधकपणे म्हटले आहे. येथे इतर अधिकारी वर्गाने हा फोटो काढला आणि नेटवर टाकल तोआता खूप व्हायरल झाला आहे.या बाबतचे अधिकृत वृत्त इंडियन एक्स्प्रेस ने आणि एन डी टी व्ही ने प्रसिद्ध केले आहे.

पोलीस म्हणतात आम्ही सर्व पोलीस अधिकारी रस्ता सुरक्षा जागरूकता च्या कार्यक्रमातुन बाहेर पडलो होते. तेव्हा मी रस्त्यावर पाहिले तेव्हा  मला दिसले की एक पुरुष  5 जणांना गाडीवर बसवून निघाला होता. विशेष म्हणजे हे गृहस्त  रस्ता सुरक्षा जागरूकतेच्या कार्यक्रमात आले होते. त्यांनी जवळपास दोन  तास कार्यक्रमास उपस्थित राहिले आणि आम्ही सांगितलेलं सर्व ऐकले होते,त्यामुळे मला धक्का बसला की असे कोणी आपल्या  परिवाराला धोक्यात घालून गाडी चालवू शकते काय ? त्यामुळे मला काही सुचेन झाले होते. हे सर्व दृश्य पाहून मी फक्त निराश झालो होतो. मी हे सर्व असहायरीत्या पाहत होतो तेव्हा त्या परिवाराला फक्त  फक्त हाथ जोडू शकत होतो. तर या व्यक्तीने लहान मुले  टाकीवर बसल्यामुळे त्याला हँडल वळवण्यास ही अडचण होऊ शकत होती. हे दृश्य पाहून मी सुन्नच झालो होतो. या वागण्याने अनेकदा अपघात होत आहे. त्यामुळे कोणीही असे करू नये.

बातमी सहाय्य : अभिषेक गोयल आय पी एस ऑफिसर , बेंगलुरू,Karnataka Cadre IPS Officer. B Tech in Computer Sciences, IIT Delhi. Views are personal. Posted as DCP Tr East.

त्यांचे ट्विटर : https://twitter.com/goyal_abhei

You May Also Like

One thought on “फोटोचे सत्य : या पोलिस अधिकाऱ्याने का ? जोडले हात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.