अवकाळी पावसाचा तडाखा : दिंडोरी तालुक्यात वीज पडून तीन तरुणांचा मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी : नाशिक शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवारी (दि. 14) सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. विजांसह झालेल्या या पावसात एका दुर्दैवी घटनेत अंगावर वीज पडून तिघा ताारुणांचा मृत्यू झाला आहे. untimely rain nashik dindori three young died lightning one cow lost

दिंडोरी तालुक्यातील येथील मानोरी गावात ही घटना घडली आहे. अनिल गवे (वय ३२), सागर गवे (वय १७) आणि रोहित गायकवाड (१८) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, पुढील २४ तासांत हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह वादळ वारे व पावसाची शक्यता वर्तविली आहे.

या पावसामुळे अनेक पिकांची नासधूस होणार असून दुष्काळी परिस्थितीत कमी प्रमाणात तग धरून असलेलीस पिकांनाही नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

दुसऱ्या एका घटनेत दिंडोरी तालुक्यातीलच शिवनई येथे वीज पडून गाय ठार झाली आहे. या अवकाळी पावसात विजांचा गडगडाट ही होत होता. शिवनई येथे विज कोसळुन बाळासाहेब भाऊराव गुंजाळ यांची गाय मृत्युमुखी पडली.

याबाबत शिवनई गावचे पोलीस पाटील पांडुरंग गडकरी यांनी महसूल विभागास याबाबत माहिती दिल्यानंतर तलाठी राजेंद्र कुलकर्णी पशुवैद्यकीय अधिकारी विनायक महाजन यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

या घटनेमुळे गुंजाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

untimely rain nashik dindori three young died lightning one cow lost
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.