अनधिकृत : आर्थिक फायदा घेणाऱ्या तळघरातील मालमत्तांवर होणार कारवाई

नाशिक : शहरातील विविध निवासी इमारतींमधील तळघरांचा बेकायदेशीरपणे आर्थिक फायदा घेणाऱ्या मालमत्तांवर नाशिक महानगरपालिका कारवाई करणार आहे. यात १२६ दुकाने, १०६ गोदामे, २५ हॉटेल्स व ४७ इतर अशा एकूण ३०४ आस्थापनांचा समावेश आहे. unauthorized use underground parking nashik municipal corporation taking action

या कारवाई विषयी संबंधितांना महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या मालमत्तांवर पुढील कारवाईसाठी करण्यासाठी नगररचना विभागाने अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

शहरातील अनेक निवासी आणि अनिवासी इमारतींत तळघरातील जागा पार्किंगसाठी आरक्षित असताना तेथे काही ठिकाणी दुकाने, हॉटेल्स, गोदामे उभारून आर्थिक फायद्यासाठी वापर केला जात असल्याच्या अनेक तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार नगररचना विभागाने सर्वेक्षण केले. यात तथ्य आढळल्याने अशा मालमत्तांना अंतिम नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. unauthorized use underground parking nashik municipal corporation taking action

या नोटिसांची मुदत संपल्यानंतर म्हणजेच पंधरा दिवसानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल असे सूत्रांकडून कळते.

अनधिकृत लॉन्सवर कारवाई सुरु

औरंगाबाद रोड सह विविध भागात वाहतूक कोंडीची मुख्य कारण ठरलेल्या अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १६२ लॉन्स, मंगल कार्यालये अनधिकृत असून त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे धोरण शासनाने आखले असून, त्यासाठी ३१ मे अखेरची मुदत आहे. या मुदतीत लॉन्सधारकांना ते अधिकृत करण्याची संधी आहे. त्यानंतर पालिकेकडून अनधिकृत बांधकामे काढण्याची कारवाई केली जाणार आहे.

 unauthorized use underground parking nashik municipal corporation taking action

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “अनधिकृत : आर्थिक फायदा घेणाऱ्या तळघरातील मालमत्तांवर होणार कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.