अनधिकृत नळ जोडण्या : ६८ नागरिकांवर गुन्हे दाखल, महापालिकेने मोहीम तीव्र केली

अनधिकृत नळ जोडण्या आणि पाण्याचे मीटर नसेल तर महापालिकेने याविरोधात कारवाई सुरु केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फौजदारी गुन्हे दाखल करायचे आदेश दिले आहेत. आयुक्त यांचे आदेशानुसार अनधिकृत नळ जोडण्या शोधुन अनधिकृत नळ जोडण्या बंद करणे व अनधिकृत नळ जोडणी धारक व त्यास जबाबदार असलेले नळ कारागीर (प्लंबर) यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदविण्याची धडक मोहिम हाती घेतली आहे. शहरातील सर्व विभागातील पाणी पुरवठयाचे अभियंते यांचेमार्फत कारवाई सुरु असुन आजमितीस 68 अनधिकृत नळजोडण्या शोधून  अनधिकृत नळजोडणी धारकांवर वेगवेगळया पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करणेत आले आहेत.

लबाडीने, अनधिकृतपणे व बेकायदेशीर पणे वापरलेले पाण्याची शुल्क वसुल करुन त्यांच्यावर भा.द.वि. कलम 379,427,430,336 अन्वये गुन्हे सबंधित पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येतील. याची अनधिककृत नळ जोडणी धारकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात गंगापुर धरण व दारणा नदीवरील चेहेडी बंधारा येथुन दररोज सर्वसाधारणपणे 430 द.ल.लि. प्रतिदिन इतके कच्चे पाणी (प्रकीया न केलेले) उचलण्यात येते त्यावर शहरातील शिवाजी नगर, बारा बंगला, पंचवटी (दिंडोरी रोड),निलगिरी बाग,गांधीनगर व नाशिक रोड येथे असलेल्या सहा जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करुन शहरातील सहा विभागात असलेल्या 103 जलकुंभादवारे व सुमारे 1800 कि.मी. लांबीच्या वितरण जलवाहीन्यावरुन सुमारे 20 लक्ष नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येतो.

पाणी पुरवठा व्यवस्थेतील तुट विचारात घेवुन शहरातील सहा विभागात नागरीकांपर्यंत सुमारे 351.82 द.ल.लि. प्रतिदिन पाणी वितरीत करण्यात येते त्याची विभाग निहाय परिमाण खालील प्रमाणे :-

 1. नाशिक पुर्व – –        51.47 द.ल.लि. प्रतिदिन
 2. नाशिक पश्चिम –        44.12 द.ल.लि. प्रतिदिन
 3. पंचवटी –        74.82 द.ल.लि. प्रतिदिन
 4. नाशिकरोड –        66.63 द.ल.लि. प्रतिदिन
 5. नविन नाशिक –        74.80 द.ल.लि. प्रतिदिन
 6. सातपुर –        39.98 द.ल.लि. प्रतिदिन

एकुण                –      351.82 द.ल.लि. प्रतिदिन

परंतु शहरात महानगरपालिकेच्या अभिलेखा प्रमाणे 1,89,053 नळजोडण्या असुन त्यादवारे फक्त 200 द.ल.लि. प्रतिदिन पाण्याची आकारणी होत आहे. तसेच पाणी पुरवठा व्यवस्था चालविणेसाठी होणारा खर्च व पाणी पुरवठया पासुन मिळणारे उत्पन्न कमी असल्याने यात मोठी महसुली तफावत आहे व त्यामुळे महापालिकेची पाणी पुरवठा योजना तोटयात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेचे पाणी लेखापरिक्षण करुन घेतले आहे. त्यादवारे असे आढळले की, शहरातील बहुसंख्य नळ जोडण्यांना असलेले पाणी मिटर नादुरुस्त आहेत तसेच काही नळ जोडणी धारकांनी मिटर काढुन टाकलेले असल्याचे आढळले आहे. तसेच अनधिकृत नळ जोडण्या मोठया प्रमाणावर असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हिशोब बाहय पाणी 43 टक्के पेक्षा जास्त दिसुन येत आहे.

त्यामुळे नाशिक क्षेत्रातील ज्या नळ जोडणी धारकांचे मिटर नादुरुस्त आहेत किंवा मिटर्स नाहीत अशा नळ जोडणी धारकांनी स्वत:हुन तातडीने महानगरपालिकेत नियमाप्रमाणे नोंद करुन मिटर दुरुस्त करावे अथवा  बदलुन घेण्याची कार्यवाही करुन त्याची नोंद महापालिकेत करावी अन्यथा त्यांचेवरही कडक कारवाई करण्यात येईल.

अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करणेसाठी अनधिकृत नळजोडणी धारकांना आवाहन करुन नाशिक महानगरपालिकेने अभययोजना दि. 7/9/2017 ते दि.21/10/2017 अशी 45 दिवसांची अभय योजना राबविण्यात आली होती.

सदर योजनेस सुरवातीला दि. 21/11/2017 पर्यंत 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही नागरीकांना शेवटची संधी देण्याचा दृष्टीकोणातून दि. 20/12/2017 पर्यंत  दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. योजने दरम्यान फक्त 2510 नळजोडणी धारकांनी आपली अनधिकृत नळजोडणी अधिकृत करुन घेतली आहे.  या योजनेस नागरीकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे नाशिक महानगरपालिकेने दि. 21/2/2018 पासुन मा. आयुक्त सो. यांचे आदेशानुसार अनधिकृत नळ जोडण्या शोधुन अनधिकृत नळ जोडण्या बंद करणे व अनधिकृत नळ जोडणी धारक व त्यास जबाबदार असलेले नळ कारागीर (प्लंबर) यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदविण्याची धडक मोहिम हाती घेतली आहे. शहरातील सर्व विभागातील पाणी पुरवठयाचे अभियंते यांचेमार्फत कारवाई सुरु असुन आजमितीस 68 अनधिकृत नळजोडण्या शोधून  अनधिकृत नळजोडणी धारकांवर वेगवेगळया पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करणेत आले आहेत.

सदरची मोहीम तीव्र करण्यात येत असुन अनधिकृत नळ जोडणी धारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी तातडीने स्वत:हुन नाशिक महानगरपालिकेशी संपर्क साधुन दंड व पाणी वापराचे शुल्क भरुन नळ जोडण्या अधिकृत करुन घ्याव्यात. जे अनधिकृत नळ जोडणी धारक तातडीने अनधिकृत नळ जोडण्या अनधिकृत करुन घेतील त्यांच्यावर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात येणार नाही तथापी नाशिक महानगरपालिके मार्फत शोध मोहीम सुरु असुन त्यात आढळलेले अनधिकृत नळ कनेक्शन बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन तसेच आज पर्यंत लबाडीने, अनधिकृतपणे व बेकायदेशीर पणे वापरलेले पाण्याची शुल्क वसुल करुन त्यांच्यावर भा.द.वि. कलम 379,427,430,336 अन्वये गुन्हे सबंधित पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येतील. याची अनधिककृत नळ जोडणी धारकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

सदर मोहीम यापुढेही धडकपणे सुरु रहाणार असुन नागरिकांना आवाहन करणेत येते की अनधिकृत नळजोडणी / पाणी चोरी बाबत काही माहीती असल्यास त्याबाबत पाणी पुरवठा विभागास खालील फोन नंबरवर माहीती दयावी. माहीती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल.

 1. नाशिक पुर्व 9422222965 / 9423179123
 2. नाशिक पश्चिम 9403697878 / 9423131321
 3. पंचवटी 8275022769 / 9607060255
 4. नविन नाशिक 9423179159  / 9423179121
 5. नाशिकरोड 9423179158 / 9423179122
 6. सातपुर 9423179153 /703902015

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.