young friends दुर्दैवी फोटो सेशनसाठी गेलेल्या दोघा तरुण मित्रांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

नाशिक शहरा जवळ असलेल्या  वासाळी शिवारातील एका पाझर तलावाजवळ छायाचित्र काढताना शनिवारी  अंबडमधील दोघा तरुण  मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुखद  घटना घडली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वासाळी गावातील पोहणाऱ्या स्थानिक तरूणांनी तलावात शोध घेऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत . याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद केली आहे.  young friends

निसर्गरम्य ठिकाण म्हणून गंगापूर धरण व आजुबाजुच्या परिसरात नेहमीच युवक, युवतींची भटकंतीसाठी गर्दी असते. सावरगाव, वासाळी, गोवर्धन, दुगाव, काश्यपी धरण परिसरातसुध्दा शहरी भागातील युवक-युवती दुचाकी, चारचाकीने नेहमीच येतात. सध्या पावसामुळे या भागातील निसर्गसौंदर्य खुलले आहे.   

अंबड खुर्द येथील महालक्ष्मीनगरमधील रहिवासी असलेले दोघे मित्र  अभिषेक भगवान जयस्वाल (१८), गणेश प्रमोद भारती (१९) पर्यटनासाठी वायनरीच्या पाठीमागील वासाळी शिवारातील पाझर तलावाजवळ गेले होते.

यावेळी एकाचा पाझर तलावात तोल गेला तर दुस-यानेही त्यास वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले आणि नाकातोंडात पाणी गेल्याने बुडून मृत्यूमुखी पडले आहेत याबाबत पोलीस सुत्रांनी माहिती दिली आहे..या घटनेची माहिती मिळताच अंबडच्या महालक्ष्मीनगरमध्ये शोककळा पसरली.young friends

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.