दुचाकीचा भीषण अपघात : पोलिस अधिकारी ठार, तर धडापासून शिर वेगळे

दुचाकीचा भीषण अपघात : पोलिस अधिकारी ठार, तर धडापासून शिर वेगळे 

नाशिक : जेलरोड – टाकळी रोडवरील असलेल्या शेलार फार्मच्या  परिसरात मधुबन लॉन्स समोर  झालेल्या एका भीषण अपघाताने नागरिक सुन्न झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की धडापासून शिर वेगेळे झाले होते. नागरिकांना हे दृश्य पाहून आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. यामध्ये त्यांनी पुढाकार घेत मृतदेह आणि शिर झाडांच्या फांद्या टाकून झाकून टाकले होते. हे सर्व दृश्य अगदी भयानक होते.कोणत्या तरी अज्ञात गाडीने त्यांना धक्का दिला की अन्य कारण आहे याचा पोलिस तपासा करत आहेत.

दोन दुचाकींमध्ये समोरा-समोर झालेल्या धडकेत एका पोलिस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर येथे कार्यरत असलेले पोलिस उप-निरीक्षकाचे नाव रमेश साळी या अपघातात मृत झाले आहेत. मधुबन लॉन्ससमोर साळी यांची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, ईझेड ०५०४) ही रस्त्याच्या कडेला पडलेली होती़ या अपघातस्थळी त्यांच्या नातेवाईकांचा मोठा आक्रोश सुरू होता़ तर नागरिकांची तोबा गर्दी झाली होती़ साळी यांनी यापुवीृ नाशिक शहर पोलीस ठाणे तसेच कळवण येथे सेवा केलेली असून गत दीड वर्षांपासून ते सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरत होते़. पोलीस उपनिरीक्षक साळी हे गत महिनाभरापासून वैद्यकीय रजेवर होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला़ दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस तपास करीत असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

व्हिडियो दृश्य विचलित करणारी आहेत :-

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.