मद्यासाठी थेट राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय कार्यालयात चोरीपॅरोलवर सुटलेले दोन संशयित घेतले ताब्यात

मद्यासाठी थेट राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय कार्यालयात चोरीपॅरोलवर सुटलेले दोन संशयित घेतले ताब्यात

शहरातील पेठ रोड  परिसरात असलेल्या राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय कार्यालयावर चोरट्यांनी चोरी करत सुमारे साडेतीन लाख रुपये किंमत असलेल्या विविध देशी-विदेशी कंपनीच्या ३ हजार २६४ बाटल्या ६८ बॉक्समधून विदेशी दारू लंपास केली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून दोन बॉक्स हस्तगत करण्यात आले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र दारूची दुकानी बंद आहेत. मात्र स्व:ताची ‘सोय’ करून घेण्यासाठी तळीरामांनी थेट राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात चोरी केली. पेठ रोडवर राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय कार्यालय आहे. या ठिकाणाहून नाशिकसह जळगाव, धुळे नंदुरबारचा कारभार चालतो. भरारी पथकामार्फत होणाऱ्या कारवाईत जप्त केलेला देशी विदेशी गावठी दारूचा मुद्देमाल ईथेच जमा केला जातो. याठिकाणी यापूर्वीही जप्त केलेली दारू चोरी गेली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी पॅरोलवर सुटलेल्या दोघा चोरट्यांनी हे गुदाम फोडले याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन विभागाचे ऋषिकेश माधवराव फुलझळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पेठरोडच्या फुलेनगर येथील मंगल मिस्तरी शिंदे (१९) आणि रामदास बन्सीलाल पाडेकर (४०) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सोमवारी (दि. ६) ते शनिवार (दि.११) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क कार्यालय गुदामाचा पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश करत सुमारे साडेतीन लाख रुपये किंमत असलेल्या विविध देशी-विदेशी कंपनीच्या ३ हजार २६४ बाटल्या चोरून नेल्या. पोलिसांनी दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नाशिक रोड येथील कारागृहामधील शिक्षा भोगत असलेला संशयित मंगल सिंग मिस्तरी शिंदे आणि रामदास बन्सीलाल पाडेकर यांनी व त्याच्या साथीदारांनी आदिवासी वसतीगृह परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात डल्ला मारला होता. २०११ मध्ये भरारी पथकाने मध्य प्रदेशमध्ये उत्पादित होणारी सुपर मास्टर ड्राय झीन हे विदेशी मद्य शहादा येथून छापा टाकून जप्त केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून  संशयित मंगल सिंग शिंदे व रामदास पाडेकर यांना ताब्यात घेतले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.